Mumbai : सहा पदपथ अतिक्रमणमुक्त; बोरिवलीत फुटपाथवरील बेकायदा अतिक्रमणे जमीनदोस्त

मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांना सुरक्षित आणि मोकळा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या अभियानांतर्गत बोरिवली पश्चिम परिसरात २० अनधिकृत बांधकामे आणि १५ अनधिकृत स्टॉल्सवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
Mumbai : सहा पदपथ अतिक्रमणमुक्त; बोरिवलीत फुटपाथवरील बेकायदा अतिक्रमणे जमीनदोस्त
Mumbai : सहा पदपथ अतिक्रमणमुक्त; बोरिवलीत फुटपाथवरील बेकायदा अतिक्रमणे जमीनदोस्त
Published on: 

मुंबई : मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांना सुरक्षित आणि मोकळा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या अभियानांतर्गत बोरिवली पश्चिम परिसरात २० अनधिकृत बांधकामे आणि १५ अनधिकृत स्टॉल्सवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. पहिल्या टप्प्यात बोरिवलीतील सहा पदपथांवरील सुमारे आठ किलोमीटर परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बोरिवली पश्चिम येथील लोकमान्य टिळक रोड, मार्केट लेन आणि बोरिवली सबवे रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली.

पदपथांवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे भाग पडत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पदपथांवरील अनधिकृत बांधकामे आणि स्टॉल्स हटविण्याची मोहीम हाती घेतली असून या कारवाईमुळे बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसह परिसरातील नागरिकांना अडथळामुक्त पदपथ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या कारवाईसाठी महापालिकेने दोन जेसीबी, पाच डंपर, १० हून अधिक अधिकारी-कर्मचारी आणि २० कामगार तैनात केले होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १५ हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

‘पादचारी प्रथम’ अभियान सुरूच

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार ‘पादचारी प्रथम’ अभियानाची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार उपायुक्त (परिमंडळ ७) मनीष वळंजु यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (आर मध्य विभाग) डॉ. प्रफुल्ल तांबे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in