Mumbai : कथित शिकारीप्रकरणी चितेच्या राखेची तपासणी; दोन छर्रे आणि अर्धवट जळालेला मोबाईल जप्त, दोघांना कोठडी

चेना जंगल परिसरात शिकारीदरम्यान गोळी लागून मृत्यू झालेल्या विजय सापटे (६०) यांच्या मृत्यूचे प्रकरण लपविण्यासाठी पुरावे नष्ट केल्याचा आरोप समोर आला आहे.
Mumbai : कथित शिकारीप्रकरणी चितेच्या राखेची तपासणी; दोन छर्रे आणि अर्धवट जळालेला मोबाईल जप्त, दोघांना कोठडी
Mumbai : कथित शिकारीप्रकरणी चितेच्या राखेची तपासणी; दोन छर्रे आणि अर्धवट जळालेला मोबाईल जप्त, दोघांना कोठडी संग्रहित छायाचित्र
Published on: 

भाईंंदर : चेना जंगल परिसरात शिकारीदरम्यान गोळी लागून मृत्यू झालेल्या विजय सापटे (६०) यांच्या मृत्यूचे प्रकरण लपविण्यासाठी पुरावे नष्ट केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या बॉम्बशोधक व निकामी पथकाने स्मशानभूमीतील चितेच्या राखेची तपासणी केली. मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने शोध घेतला असता दोन धातूचे छरे आणि अर्धवट जळालेला मोबाइल आढळला. या प्रकरणातील दोन आरोपींना २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चेना येथील डेबुचा घाट परिसरात ही घटना घडली. वन्यप्राणी आणि रानडुकरांची शिकार करण्यासाठी सात जण प्रतिबंधित क्षेत्रात गेल्याचा आरोप आहे. डोंगरावरून उतरताना मोबाइलचा प्रकाश दिसल्याने तो वन्यप्राण्याचे डोळे असल्याचा गैरसमज करून महेश गायकर याने गोळीबार केल्याचा आरोप आहे. या गोळीबारात विजय सापटे यांच्या छातीला व पायाला छरे लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर कल्पेश डगला आणि कुणाल शेलार हे जखमी झाले.

Mumbai : कथित शिकारीप्रकरणी चितेच्या राखेची तपासणी; दोन छर्रे आणि अर्धवट जळालेला मोबाईल जप्त, दोघांना कोठडी
Mumbai : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

मृत्यूची माहिती पोलिसांना न देता मृतदेह घरी आणून पहाटे चेना गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे तपासात समोर आले. व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलद्वारे डॉक्टरांना मृतदेह दाखवून मृत्यू प्रमाणपत्र मिळवल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे डाग असलेली पाने, दगड, चप्पल आणि बंदुकीचे भाग जप्त केले आहेत.

Mumbai : कथित शिकारीप्रकरणी चितेच्या राखेची तपासणी; दोन छर्रे आणि अर्धवट जळालेला मोबाईल जप्त, दोघांना कोठडी
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीचा रक्तरंजित थरार! गोळी लागून एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मृतदेहाची परस्पर लावली विल्हेवाट

या प्रकरणी महेश अनंत गायकर, रोहित सापटे, कल्पेश डगला, कुणाल शेलार, काठोड लाबड, प्रवीण जाधव आणि डॉ. राजेश पालांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश गायकर आणि काठोड लाबड यांना अटक झाली असून, डॉक्टरांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे. जप्त साहित्याच्या न्यायवैद्यक तपासणीतून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in