धक्कादायक! मुंबई-कुशीनगर एक्स्प्रेसच्या बाथरूममध्ये आढळला चिमुकलीचा मृतदेह

लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे उभी असलेल्या मुंबई-कुशीनगर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एसी कोच बी-२ च्या बाथरूममध्ये कचराकुंडीत एका ५ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला.
धक्कादायक! मुंबई-कुशीनगर एक्स्प्रेसच्या बाथरूममध्ये आढळला चिमुकलीचा मृतदेह
Published on

लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे उभी असलेल्या मुंबई-कुशीनगर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एसी कोच बी-२ च्या बाथरूममध्ये कचराकुंडीत एका ५ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.

साफसफाई दरम्यान धक्कादायक दृश्य

कुशीनगर एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २२५३७) शनिवारी (दि. २३) दुपारी साधारण १.१५ वाजता LTT च्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर पोहोचली. हीच गाडी नंतर काशी एक्स्प्रेस (१५०१७) म्हणून पुढे रवाना होते. मात्र, नियमानुसार सुरू असलेल्या स्वच्छतेदरम्यान स्वच्छता कर्मचाऱ्याने एसी कोच बी-२ च्या बाथरूममध्ये डोकावले असता, कचराकुंडीत एका लहान मुलीचा मृतदेह दिसून आला. हे दृश्य पाहून तो हादरला आणि त्याने तात्काळ स्टेशन व्यवस्थापकांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि जीआरपी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, मृत मुलीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेचा प्रत्येक पैलू तपासला जात आहे आणि लवकरच संपूर्ण तपशीलवार अहवाल सादर केला जाणार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

logo
marathi.freepressjournal.in