मुंबई एअरपोर्टवर CISF महिला जवानांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ; CPR देत वाचवला प्रवासी महिलेचा जीव, Video

CISF ने दिलेल्या माहितीनुसार, एक प्रवासी महिला अचानक जमिनीवर पडली. त्यावेळी परिसरात काही क्षण गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मुंबई एअरपोर्टवर CISF महिला जवानांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ; CPR देत वाचवला प्रवासी महिलेचा जीव, Video
मुंबई एअरपोर्टवर CISF महिला जवानांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ; CPR देत वाचवला प्रवासी महिलेचा जीव, Video
Published on

मुंबई विमानतळाच्या सिक्युरिटी होल्ड एरियामध्ये एक प्रवासी महिला अचानक बेशुद्ध पडली. मात्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) दोन महिला जवानांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ CPR आणि प्रथमोपचार दिल्याने मोठा अनर्थ टळला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून दोन्ही महिला जवानांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

CISF ने दिलेल्या माहितीनुसार, "एक प्रवासी महिला अचानक जमिनीवर पडली. त्यावेळी परिसरात काही क्षण गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी एल/एसआय (एक्झे.) अंजली सिध आणि एल/एचसी (जीडी) के. यू. सुनीता यांनी वेळ न दवडता तात्काळ महिलेकडे धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत CPR आणि प्रथमोपचार सुरू केले."

विमानतळावरील वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन्ही महिला जवान सातत्याने प्रयत्न करत होत्या. त्यांच्या वेळेवर केलेल्या मदतीमुळे महिलेची प्रकृती स्थिर करण्यात यश आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला वैद्यकीय पथकात पाठवण्यात आले.

व्हिडीओत कैद झाला थरारक क्षण

CISF ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये संबंधित महिला प्रवासी सिक्युरिटी होल्ड एरियाकडे जात असताना अचानक पडल्याचे दिसते. महिला खाली पडताच प्रवासी आणि विमानतळ कर्मचारी मदतीसाठी धावताना दिसतात.

याचवेळी अंजली सिध आणि के. यू. सुनीता यांनी तात्काळ प्रतिसाद देत महिलेला मदत केली. दोन्ही महिला जवानांनी क्षणाचाही विलंब न करता CPR देण्यास सुरुवात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.

CISF कडून महिला जवानांचे कौतुक

या घटनेमुळे केवळ सुरक्षा पुरवण्यापुरतीच CISF ची भूमिका मर्यादित नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना मदत करण्यासाठी CISF कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे वैद्यकीय संकट किंवा इतर अनपेक्षित घटनांमध्ये ते अनेकदा मदतीसाठी पुढाकार घेतात.

CISF नेही दोन्ही महिला जवानांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी दलाची असलेली बांधिलकी त्यांच्या कृतीतून दिसून आली, असे निवेदनात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in