

मुंबईतील प्रसिद्ध कूपर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात औषधांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ज्यामुळे रुग्णांना मूलभूत उपचारांसाठीही संघर्ष करावा लागत आहे. शहरातील महत्त्वाचे महापालिकेचे रुग्णालय असलेल्या कूपर रुग्णालयात औषधांची कमतरता आणि आवश्यक तपासण्यांमध्ये विलंब, तसेच अँटी-रेबिज लस उपलब्ध न होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ज्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची गरज पडली आहे.
महत्त्वाची औषधे उपलब्ध नाहीत
FPJ ने दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णालयातील महत्त्वाची औषधे जसे की अँटीबायोटिक्स, कॅल्शियम गोळ्या, वेदनाशामक औषधे आणि मानसिक आरोग्य उपचारासाठी लागणारी औषधे रुग्णालयाच्या फार्मसीतून गायब झाली आहेत. त्यामुळे रुग्णांना ती औषधे बाहेरून खरेदी करावी लागत आहेत.
डीएन नगर येथील रहिवासी गिता शर्मा म्हणाल्या की, "मी माझ्या मुलासाठी अँटी-रेबिज लस घेण्यासाठी गेली होती. पण, डॉक्टरांनी सांगितले की लस उपलब्ध नाही. त्यांनी आम्हाला व्ही. एन. देसाई रुग्णालयात पाठवले."
रुग्ण असेही सांगत आहेत की, रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये औषधांच्या कमतरतेमुळे त्यांना हातमोजे, सुई खासगी स्टोअरमधून आणण्यास सांगितले जाते.
मानसिक रुग्णांवर याचा अधिक परिणाम झाला आहे. कारण महिन्याहून अधिक काळ औषधे उपलब्ध नाहीत. जुहू येथे राहणाऱ्या बाबर शेख यांनी सांगितले, की "मी माझ्या भावाच्या मानसिक औषधांसाठी रुग्णालयात पुन्हा पुन्हा जात आहे, पण ते दरवेळी सांगतात की स्टॉक नाहीये.
रुग्णालय दररोज हजारो रुग्णांना सेवा देते
जुहू-विद्यापीठ क्षेत्रात स्थित असलेले कुपर रुग्णालय दररोज अंदाजे २,००० रुग्णांना सेवा पुरवते. ज्यामध्ये अंधेरी, सांताक्रूझ, खार, बांद्रा, जोगेश्वरी आणि मालाड येथील रुग्णांचा समावेश आहे. मुंबईच्या दोन्ही आंतरराष्ट्रीय, स्थानिक विमानतळांना आणि पश्चिम एक्सप्रेस हायवेच्या जवळ असलेल्या कूपर रुग्णालयाने आपत्कालीन आणि अपघात प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत त्याच्या वैद्यकीय सेवांमध्ये मोठा घट झाल्याचे दिसून आले आहे.
रुग्णालयाने औषधांची कमतरता नाकारली
रुग्णालयाशी संपर्क साधल्यावर, मुंबई महापालिका संचालिका आणि कूपर रुग्णालयाच्या कार्यवाहक प्रमुख डॉ. नीलम आंद्राडे यांनी औषधांची कमतरता असल्याचे आरोप नाकारले. त्यांनी सांगितले की, अशी कमतरता होणे अशक्य आहे आणि त्यांनी आरोपांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली.
तथापि, कूपर रुग्णालयातील चालू संकटाने मुंबईतील महापालिका आरोग्य सेवांमधील वाढती दरी अधोरेखित करते.