Mumbai : "ड्रग्ज प्रकरणात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करेन"; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसाची धमकी, VIDEO व्हायरल

मुंबईतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Mumbai : "ड्रग्ज प्रकरणात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करेन"; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसाची धमकी, VIDEO व्हायरल
Mumbai : "ड्रग्ज प्रकरणात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करेन"; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसाची धमकी, VIDEO व्हायरल
Published on

मुंबई : NEET पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना "पुन्हा आंदोलनात सहभागी झालात तर खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवू," अशी धमकी एका मुंबई पोलिस अधिकाऱ्याने दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला असून, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या प्रकरणावरून पोलिसांवर टीका केली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसते?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी ताब्यात घेतलेल्या काही विद्यार्थ्यांशी बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित अधिकारी, "पुन्हा आंदोलनात दिसलात तर तुमच्या खिशात ५० ग्रॅम पावडर (ड्रग्ज) टाकून आयुष्यभरासाठी जेलमध्ये टाकू. जामीनही मिळणार नाही," अशी धमकी देताना ऐकू येत आहे. तसेच, "माझ्यासारखा वाईट माणूस दुसरा नाही. तुम्ही आमच्यासाठी त्रास निर्माण करत आहात," असेही तो म्हणताना ऐकू येत आहे.

काँग्रेसने व्हिडिओ शेअर करत केला निषेध

हा व्हिडिओ मुंबई काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर करत तीव्र निषेध नोंदवला आहे. पक्षाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "जर हा व्हिडिओ खरा असेल, तर हा केवळ विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न नसून लोकशाही अधिकारांवर थेट हल्ला आहे. स्वतःचा आवाज उठवणे हा गुन्हा नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना धमक्यांनी नव्हे, तर उत्तरदायित्वाने उत्तर दिले पाहिजे."

हर्षवर्धन सपकाळ यांचीही टीका

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी अशा प्रकारची दडपशाही लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याची टीका त्यांनी केली.

मुंबई पोलिसांकडून चौकशीचे आदेश

'फ्री प्रेस जर्नल'ने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुंबई पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची सत्यता आणि त्यामागील परिस्थितीची चौकशी सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई पोलिसांचे उपपोलीस आयुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी अधिकृत निवेदनात म्हटले की, "या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्हिडिओतील तथ्यांची पडताळणी केल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल."

Mumbai : "ड्रग्ज प्रकरणात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करेन"; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसाची धमकी, VIDEO व्हायरल
१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

दरम्यान, व्हिडिओतील पोलीस अधिकारी नेमका कोण आहे आणि व्हायरल व्हिडिओतील संभाषणाचा संदर्भ काय आहे, याबाबत अद्याप मुंबई पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. चौकशी अहवालानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in