CSMT : लाल बॅगेचं गूढ उलगडलं! कोणताही धोका नाही, बॅगेत आढळल्या 'या' वस्तू

CSMT बस स्थानकाबाहेर शुक्रवारी (दि. १४) सापडलेल्या लाल रंगाच्या संशयित बॅगेमुळे काही काळासाठी मोठी खळबळ उडाली होती.
CSMT : लाल बॅगेचं गूढ उलगडलं! कोणताही धोका नाही, बॅगेत आढळल्या 'या' वस्तू
Published on

CSMT बस स्थानकाबाहेर शुक्रवारी (दि. १४) सापडलेल्या लाल रंगाच्या संशयित बॅगेमुळे काही काळासाठी मोठी खळबळ उडाली होती. मात्र, बॉम्ब शोधक-नाशक पथकाच्या (BDDS) तपासणीनंतर मोठा दिलासा मिळाला असून, बॅगेत कोणतेही स्फोटक किंवा संशयास्पद साहित्य नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

तपासणीत काय आढळले?

बॉम्ब स्क्वॉड पथकाचे अधिकारी सचिन जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, बॅगेत फक्त कपडे आणि कागदपत्रे आढळली असून कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

काय घडले होते?

दुपारी ४.४५ च्या सुमारास CSMT बस डेपोच्या कठड्याजवळ लाल रंगाची बॅग आढळली. बराच वेळ ती बॅग एकाच ठिकाणी असल्याने नागरिकांनी संशय व्यक्त करत पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तात्काळ परिसर रिकामा केला व तपासणी सुरू केली. BDDS पथकाने बॅगची बारकाईने तपासणी केली. बॅग कोणाची आहे हे अजूनही समजलेले नसून ती कोणीतरी विसरून गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे तसेच सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वस्तू दिसल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून CSMT परिसरातील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in