कुख्यात दाऊद टोळीच्या गुंडाला दुबईत अटक

२५० कोटी रुपयांच्या अमली पदार्थ प्रकरणातील प्रमुख आरोपी साहिल शेख याला दुबईत अटक करण्यात आली आहे. साहिल हा ड्रग्ज माफिया सलीम डोला याचा निकटवर्तीय असल्याचे मानले जाते, तर डोला हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा मानला जातो.
कुख्यात दाऊद टोळीच्या गुंडाला दुबईत अटक
कुख्यात दाऊद टोळीच्या गुंडाला दुबईत अटकसंग्रहित छायाचित्र
Published on: 

पूनम अपराज/मुंबई

२५० कोटी रुपयांच्या अमली पदार्थ प्रकरणातील प्रमुख आरोपी साहिल शेख याला दुबईत अटक करण्यात आली आहे. साहिल हा ड्रग्ज माफिया सलीम डोला याचा निकटवर्तीय असल्याचे मानले जाते, तर डोला हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा मानला जातो. साहिलला भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या घाटकोपर अमली पदार्थविरोधी कक्षाकडून (एएनसी) या संपूर्ण ड्रग्ज तस्करी नेटवर्कचा तपास केला जात आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, साहिल दुबईतून कारवाया करत होता. तसेच टोळीचे आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि ड्रग्ज पुरवठा साखळीही तो हाताळतो, असा आरोप आहे.

तपासाची व्याप्ती ग्लॅमर इंडस्ट्रीपर्यंत

२५० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरू असताना मुंबईतील उच्चभ्रू वर्तुळांबरोबरच वलयांकीत उद्योगातील संबंधितही या प्रकरणात गुंतले असल्याचे तपासात उघड झाले आहे. तपासाचा भाग म्हणून घाटकोपर एएनसीच्या पथकाने प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरी आणि अभिनेता सिद्धांत कपूर यांचीही चौकशी केली होती. या टोळीच्या ड्रग्ज कारवायांची व्याप्ती आणि त्यांचे कोणकोणत्या वर्तुळांपर्यंत आहेत, याचा पोलिस तपास करत आहेत.

यापूर्वी याच प्रकरणात साहिलचा धाकटा भाऊ मोहम्मद सलिम सोहेल शेख ऊर्फ लविश याला पोलिसांनी अटक केली होती. त्याची सखोल चौकशी करताना त्याने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहिती आणि पुराव्यांच्या आधारे तपास यंत्रणांना साहिलचा माग काढण्यात मदत झाली. साहिल दुबईत लपून बसल्याची माहिती उघडकीस आली होती.

कुख्यात दाऊद टोळीच्या गुंडाला दुबईत अटक
Mumbai : दाऊद इब्राहिमच्या जुन्या घरावर अखेर हातोडा; भेंडी बाजारात BMC ची तोडक कारवाई सुरू; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

दरम्यान, २००४ पासून दाऊद इब्राहिमच्या टोळीतील किमान पाच प्रमुख गुन्हेगारांना विविध प्रक्रियांद्वारे भारतात आणण्यात आले आहे. मात्र, ही मुंबई पोलिसांची अधिकृत संख्या नाही. या प्रकरणांमध्ये मुंबई पोलिस, सीबीआय आणि एनसीबीसह विविध तपास यंत्रणांचा सहभाग होता. एजाज लकडावाला याला या यादीत प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणलेल्यांमध्ये समाविष्ट करता येणार नाही. त्याला जानेवारी २०२० मध्ये पाटणा येथे मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)