दाऊदच्या ड्रग्ज रॅकेटवर ईडीची कारवाई; मुंबई व गुजरातमध्ये २० ठिकाणी छापे

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मोठी कारवाई केली. ईडीने मुंबईसह गुजरातमधील सुरत, अंकलेश्वर आणि राजकोट येथील २० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.
दाऊदच्या ड्रग्ज रॅकेटवर ईडीची कारवाई; मुंबई व गुजरातमध्ये २० ठिकाणी छापे
Published on

मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मोठी कारवाई केली. ईडीने मुंबईसह गुजरातमधील सुरत, अंकलेश्वर आणि राजकोट येथील २० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.

सलीम इस्माईल डोला आणि त्याच्या साथीदारांकडून चालवल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटविरुद्ध मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, या खळबळजनक कारवाईने ड्रग्ज माफियांमध्ये घबराट पसरली आहे.

या कारवाईत अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनांचे पुरवठादार, औद्योगिक रसायनांचे व्यापारी आणि एमडी ड्रग्जच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या संशयितांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. याच वर्षी मे महिन्यात तुर्कीमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलेला सलीम डोला हा पाकिस्तानात लपलेल्या दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार आहे.

काळ्या पैशाची बेनामी मालमत्तांमध्ये गुंतवणूक

ईडीने मुंबईत दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांच्या आधारे हा तपास सुरू केला असून, हवाला नेटवर्कच्या माध्यमातून हा काळा पैसा भारतात आणि परदेशात बेनामी मालमत्तांमध्ये गुंतवला गेल्याचे उघड झाले आहे. या आर्थिक गैरव्यवहारात सीए आणि मध्यस्थांची भूमिका असून, ईडी संपूर्ण साखळीचा कसून तपास करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in