उद्धव ठाकरेंसोबतचे अनेक लोकप्रतिनिधी आमच्याकडे येणार; मला म्हाडा अध्यक्षपद फडणवीसांनी दिले -उदय सामंत

उद्धव ठाकरेंसोबतचे अनेक लोकप्रतिनिधी आमच्याकडे येणार; मला म्हाडा अध्यक्षपद फडणवीसांनी दिले -उदय सामंत

कोकण दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
Published on

प्रतिनिधी/मुंबई : मला म्हाडाचे अध्यक्षपद देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. शिवसेनेत असताना मी मंत्री निश्चितच झालो. पण तेव्हाही माझे नाव कापण्याचे प्रयत्न सुरू होते. तेव्हा सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी माझे मंत्रिपद त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न केल्यानेच मला मंत्रिपदाची शपथ घेता आली. उद्धव ठाकरे आताच कोकण दौरा करून गेले. पण या दौऱ्यात त्यांच्याच व्यासपीठावर जे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी बसले होते त्यातील अनेक जण आमच्याकडे येणार आहेत. लवकरच त्यांचे पक्षप्रवेश होतील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

कोकण दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे आमच्या कौटुंबिक व्यवसायांवर टीका करतात. आम्ही गद्दार असल्याचे म्हणतात. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेससोबत कधीच जायचे नाही या मताचे होते. ज्या पक्षासोबत युती करून जनमत मिळविले त्याला सोडून काँग्रेससोबत तर आम्ही गेलो नाही. उलट भाजपसोबतच जाऊन सरकार स्थापन केले. जनमताचाच आदर आम्ही केला. व्यवसाय करूनच गाड्या घेतो. कोणतेही व्यवसाय वा उद्योगधंदे न करता सहा मजल्यांचे घर कोणी बांधले, असा प्रश्न मात्र मी कधीच विचारणार नाही, असे उदय सामंत म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in