म्हाडा मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात

पोलीस पथकाने व म्हाडातील सुरक्षारक्षकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली
म्हाडा मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात
Published on

मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या मुख्यालयात 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते शुक्रवारी ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस पथकाने व म्हाडातील सुरक्षारक्षकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यावेळी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, म्हाडाचे मुख्य अभियंता -१ धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता -२ सुनील जाधव, मुख्य अभियंता -३ शिवकुमार आडे, कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी रवींद्र पाटील, 'म्हाडा'चे सचिव राजकुमार सागर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, उपमुख्य अभियंता अनिल अंकलगी, उपमुख्य अभियंता किशोरकुमार काटवटे, उपमुख्य अभियंता भूषण देसाई, उपमुख्य अभियंता प्रशांत धात्रक, दक्षता व सुरक्षा अधिकारी संजय शिंदे आदींसह म्हाडातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in