
मुंबई : घाटकोपर होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू झालेल्या घटनेतील आरोपी आणि जाहिरात कंपनीचे संचालक भावेश भिंडे यांनी येथे एका न्यायालयात सुटकेसाठी अर्ज दाखल केला असून आपल्यावरील आरोप हे केवळ सार्वजनिक भावना नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने केल्याचे म्हटले आहे.
भिंडे हा सध्या जामिनावर असून त्याने आपण निर्दोष असल्याचा दावा दावा केला आहे. आपल्याला खोट्या आरोपांमध्ये अडकवले असल्याचा दावा भिंडे याने केला आहे. घाटकोपरमधील एका पेट्रोल पंपावर १३ मे रोजी महाकाय होर्डिंग कोसळले होते. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे आणि पावसामुळे या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता.
सुटकेसाठीचा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. पाथडे यांच्यासमोर नुकताच दाखल करण्यात आला. न्यायालयाने यावर सरकारी वकिलांचा प्रतिसाद मागवला असून या प्रकरणावर ७ डिसेंबरपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे.
भावेश भिंडे याने आपल्या सुटकेच्या अर्जात सांगितले की, कंपनी एगोन मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या स्थापनेपासून ते विशेष होर्डिंगच्या बांधकामापर्यंत तो कोणत्याही प्रकारे कंपनीशी संबंधित नव्हता.
या प्रकरणातील दुसरी आरोपी जान्हवी मराठे ही कंपनीची संचालक होती व २१ डिसेंबर २०२३ रोजी तिच्या राजीनाम्यानंतरच आपण एगोन मीडिया कंपनीचे संचालक बनलो, असे भिंडे याने न्यायालयाला सांगितले. भिंडे म्हणाला की, होर्डिंग आधीच तयार झाले होते आणि त्याने कंपनीचे व्यवस्थापन हाती घेतल्यावरच संबंधित होर्डिंगवर जाहिराती येत होत्या.
आपल्यावर केलेले आरोप निराधार, खोटे आहेत, असे भिंडेने आपल्या अर्जात म्हटले आहे. आरोप करणारे (भिंडे) निर्दोष आहेत आणि त्यांना खोट्या आरोपात अडकवले गेले आहे. या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही, असे वकिलामार्फत अर्जात दावा करण्यात आला आहे.
पहिल्या आरोपीने आपल्याविरुद्ध दाखल केलेली तक्रार निराधार असून केवळ सार्वजनिक भावना नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने आरोप करण्यात आले आहे, असे भिंडेने म्हटले आहे.
संबंधित प्रकरणात न्यायालयाने नुकताच जान्हवी मराठे हिला जामीन मंजूर केला आहे.