''तुम्हीच हिंदीत बोला...'' मराठी लोकांसमोर घाटकोपरमधील महिलेची मग्रुरी, व्हिडिओ व्हायरल

राज्यात सध्या मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा चांगलाच गाजत असताना, मुंबईतील घाटकोपर भागात घडलेली एक घटना पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. २० जुलै रोजी घाटकोपर पूर्व येथे एका परप्रांतीय महिलेने मराठी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आणि हिंदीतच बोलण्याचा आग्रह धरत स्थानिक नागरिकांशी थेट वाद घातला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
''तुम्हीच हिंदीत बोला...'' मराठी लोकांसमोर घाटकोपरमधील महिलेची मग्रुरी, व्हिडिओ व्हायरल
Published on

राज्यात सध्या मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा चांगलाच गाजत असताना, मुंबईतील घाटकोपर भागात घडलेली एक घटना पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. घाटकोपर पूर्व येथे एका परप्रांतीय महिलेने मराठी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आणि हिंदीतच बोलण्याचा आग्रह धरत स्थानिक नागरिकांशी थेट वाद घातला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सदर महिलेचे नाव संजिरा देवी असून ती मूळची बिहारची आहे. ती घाटकोपर पूर्व भागात एक लहान दुकान चालवते. घटनेच्या दिवशी, तिचे दोन स्थानिक पुरुषांशी किरकोळ कारणावरून भांडण झाले.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की, वादादरम्यान एका व्यक्तीने तिला "मराठीत बोल, हा महाराष्ट्र आहे" असं सांगितल्यावर संजिरा देवीने मग्रुरी दाखवत उत्तर दिलं, “मी मराठीत नाही बोलणार. तुम्हीच हिंदीत बोला. तुम्ही हिंदुस्थानचे नाही का?” या उत्तरामुळे स्थानिक नागरिकांचा रोष अधिक वाढला. जमावातील एका व्यक्तीने संतापून म्हटलं, “धंदा करायचा असेल तर कर, नाहीतर जा युपी-बिहारला!”

विक्रोळीमधील घटना -

या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्यावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी, १६ जुलै रोजी विक्रोळीच्या टागोर नगर भागातही असाच एक वाद घडला होता. तेव्हा एका स्थानिक व्यापाऱ्याने मराठी समाजाविरोधात आक्षेपार्ह व्हॉट्सॲप स्टेटस टाकल्याच्या आरोपावरून मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली होती.

logo
marathi.freepressjournal.in