
यंदाच्या दसरा मेळ्यात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. शिवसेनेने पक्ष म्हणून परवानगी मागणारी याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळून शिंदे गटाला दणका दिला होता. त्यामुळे शिवसेनेला परवानगी देणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी दिल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार? त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान शिवसेना, मुंबई महापालिका आणि शिंदे गटाने आपापल्या बाजू मांडल्या आहेत. त्यानंतर हायकोर्टाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली.
Dasra Melava : शिंदे गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली, शिंदे गटाला मोठा धक्का