काँग्रेसच्या अंतर्गत वादावर थोरात - एच. के. पाटील यांच्यात बैठक; काय म्हणाले एच. के. पाटील?

नाशिक पदवीधर मतदारसंघातील सत्यजी तांबे यांच्या उमेदवारीवरून सुरु झालेल्या राजकारणानंतर काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता
काँग्रेसच्या अंतर्गत वादावर थोरात - एच. के. पाटील यांच्यात बैठक; काय म्हणाले एच. के. पाटील?

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सुरु झालेल्या काँग्रेसच्या अंतर्गत वादावर आता पडदा पडणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आज काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासोबत एक बैठक घेतली. यानंतर आता बाळासाहेब थोरात यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले का? यावर आद्यपही सस्पेन्स कायम असून थोरातांनी रायपूर इथे होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार? काँग्रेस हायकमांडकडून हालचालींना वेग

या भेटीनंतर एच. के. पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, "मी बाळासाहेब थोरातांचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतले. काही दिवसांपूर्वीच मी काँग्रेस अध्यक्षांना भेटलो होतो. याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच राज्यामध्ये झालेले गैरसमज त्यांच्यापर्यंत पोहोचवले. हे सर्व गैरसमज हे काँग्रेस पक्षाचे कौटुंबिक आहेत. त्यामुळे या समस्या लवकरच सोडवण्यात येणार आहेत. तर, बाळासाहेब थोरात हे रायपूरला होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. हा आमचा अंतर्गत कौटुंबिक वाद आहे. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही.मी त्यांना विनंती केली की, तुम्ही काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहा. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि थोरात यांची भेट होणार आहे. तसेच थोरात यांचा राजीनामा मंजुर झालेला नाही," अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in