साखर गोड नाही, 'स्मार्ट' व्हायला हवी; भारतीय अन्न उद्योगाला आवाहन

भारतात दरवर्षी लाखो नागरिक मधुमेह आणि लठ्ठपणाच्या विळख्यात सापडत असताना, साखर कपात हा विषय आता केवळ आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक बहुआयामी वैज्ञानिक, तांत्रिक, नियामक आणि व्यावसायिक प्रश्न बनला असून त्यावर ठोस, समन्वित उत्तर शोधण्यासाठी देशातील अन्न शास्त्रज्ञ, नियामक संस्था आणि उद्योग क्षेत्र मुंबईत एकत्र आले.
साखर गोड नाही, 'स्मार्ट' व्हायला हवी; भारतीय अन्न उद्योगाला आवाहन
साखर गोड नाही, 'स्मार्ट' व्हायला हवी; भारतीय अन्न उद्योगाला आवाहन
Published on

मुंबई : भारतात दरवर्षी लाखो नागरिक मधुमेह आणि लठ्ठपणाच्या विळख्यात सापडत असताना, साखर कपात हा विषय आता केवळ आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक बहुआयामी वैज्ञानिक, तांत्रिक, नियामक आणि व्यावसायिक प्रश्न बनला असून त्यावर ठोस, समन्वित उत्तर शोधण्यासाठी देशातील अन्न शास्त्रज्ञ, नियामक संस्था आणि उद्योग क्षेत्र मुंबईत एकत्र आले.

असोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट्स अँड टेक्नॉलॉजिस्ट्स- इंडिया मुंबई चॅप्टरने सीएसआयआर- केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थाच्या सहयोगाने बुधवारी मुंबईतील सीप्झ येथील भारत रत्नम सभागृहात "चिनी कम २०२६- साखर कपातीवरील भागधारक परिषद" आयोजित केली. अन्न व पेय निर्मितीतील साखर कपातीचे तांत्रिक दृष्टिकोन या विषयावरील या एकदिवसीय परिषदेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ, नियामक अधिकारी, बहुराष्ट्रीय अन्न कंपन्या आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ क्षेत्रातील स्टार्टअप्स एकत्र आले. चव, पोत आणि व्यावसायिक व्यवहार्यता न गमावता भारताच्या अन्नपुरवठ्यातून साखर कमी करण्याचा व्यावहारिक मार्ग आखणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट होते.

logo
marathi.freepressjournal.in