अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या

या तरुणाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या

मुंबई : गेल्या आठवड्यात कुर्ल्यातील मिठी नदीत सापडलेल्या एका अज्ञात तरुणाच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. अमान अब्दुल करीम शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्या हत्येप्रकरणी नफीस शराफत खान ऊर्फ कक्की, मुकेश श्यामनारायण पाल आणि मोहम्मद साकिर सैद ऊर्फ जस्तीन या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपी गोवंडीतील रहिवाशी असून, त्यांच्याकडून गुन्ह्यांतील घातक शस्त्रांसह एक रिक्षा जप्त केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांनी सांगितले. ५ जानेवारीला कुर्ला येथील मिठी नदीत पोलिसांना एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह सापडला होता.

या तरुणाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. या तरुणाची हत्या करून नंतर मृतदेह नदीत फेंकून मारेकऱ्यांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले होते

logo
marathi.freepressjournal.in