Monsoon Travel Alert : मुंबईहून गोवा-केरळ ट्रिप प्लॅन करताय? कोकण रेल्वेने बदलले अनेक गाड्यांचे वेळापत्रक; प्रवासापूर्वी 'हे' नक्की वाचा

या बदलांचा परिणाम मुंबईहून मडगाव, मंगळुरू, करमळी, तिरुवनंतपुरम, एर्नाकुलमसह विविध ठिकाणांकडे धावणाऱ्या गाड्यांवर होणार आहे.
Monsoon Travel Alert : मुंबईहून गोवा-केरळ ट्रिप प्लॅन करताय? कोकण रेल्वेने बदलले अनेक गाड्यांचे वेळापत्रक; प्रवासापूर्वी 'हे' नक्की वाचा
Monsoon Travel Alert : मुंबईहून गोवा-केरळ ट्रिप प्लॅन करताय? कोकण रेल्वेने बदलले अनेक गाड्यांचे वेळापत्रक; प्रवासापूर्वी 'हे' नक्की वाचा
Published on

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची घोषणा सेंट्रल रेल्वेकडून करण्यात आली आहे. अधिकृत माहितीनुसार, १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीत अनेक गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.

या बदलांचा परिणाम मुंबईहून मडगाव, मंगळुरू, करमळी, तिरुवनंतपुरम, एर्नाकुलमसह विविध ठिकाणांकडे धावणाऱ्या गाड्यांवर होणार आहे.

२५ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

  • गाडी क्रमांक २२२२९ - CSMT-मडगाव वंदे भारत (०५:२५ - १६:००)

  • गाडी क्रमांक २२२३० - मडगाव-CSMT वंदे भारत (१२:२० - २२:३०)

  • गाडी क्रमांक २२११९ - CSMT-मडगाव तेजस एक्स्प्रेस (०५:५० - १७:२०)

  • गाडी क्रमांक २२१२० - मडगाव-CSMT तेजस एक्स्प्रेस (१२:५० - ००:३०)

  • गाडी क्रमांक ११०९९ - LTT-मडगाव एक्स्प्रेस (००:४५ - १४:४०)

  • गाडी क्रमांक १११०० - मडगाव-LTT एक्स्प्रेस (११:३० - २३:४५)

  • गाडी क्रमांक १२१३३ - CSMT-मंगळुरू जंक्शन एक्स्प्रेस (२२:४५ - १५:४०)

  • गाडी क्रमांक १२१३४ - मंगळुरू जंक्शन-CSMT एक्स्प्रेस (१६:३५ - १०:३२)

  • गाडी क्रमांक २०१११ - CSMT-मडगाव एक्स्प्रेस (२३:०२ - ११:४०)

  • गाडी क्रमांक २०११२ - मडगाव-CSMT एक्स्प्रेस (१८:०० - ०५:४०)

  • गाडी क्रमांक १२०५१ - CSMT-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस (०५:१० - १६:४०)

  • गाडी क्रमांक १२०५२ - मडगाव-CSMT जनशताब्दी एक्स्प्रेस (१२:०० - ००:१०)

  • गाडी क्रमांक १०१०३ - CSMT-मडगाव मांडवी एक्स्प्रेस (०७:१० - २१:५५)

  • गाडी क्रमांक १०१०४ - मडगाव-CSMT मांडवी एक्स्प्रेस (०८:३० - २१:४५)

  • गाडी क्रमांक २२११५ - LTT-करमळी एसी एक्स्प्रेस (००:५० - १२:४०)

  • गाडी क्रमांक २२११६ - करमळी-LTT एसी एक्स्प्रेस (१३:४० - ००:२०)

  • गाडी क्रमांक १६३४५ - LTT-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस (११:४० - १९:३५)

  • गाडी क्रमांक १६३४६ - तिरुवनंतपुरम-LTT नेत्रावती एक्स्प्रेस (०९:१५ - १७:०५)

  • गाडी क्रमांक १२६१९ - LTT-मंगळुरू मत्स्यगंधा एक्स्प्रेस (१५:२० - १०:२०)

  • गाडी क्रमांक १२६२० - मंगळुरू-LTT मत्स्यगंधा एक्स्प्रेस (१२:४५ - ०६:३५)

  • गाडी क्रमांक १२२०१ - LTT-तिरुवनंतपुरम गरीब रथ एक्स्प्रेस (१६:४५ - २२:४५)

  • गाडी क्रमांक १२२०२ - तिरुवनंतपुरम-LTT गरीब रथ एक्स्प्रेस (०७:४५ - १४:४०)

  • गाडी क्रमांक २२११३ - LTT-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस (१६:४५ - २२:४५)

  • गाडी क्रमांक २२११४ - तिरुवनंतपुरम-LTT एक्स्प्रेस (००:५५ - ०८:००)

  • गाडी क्रमांक १२२२३ - LTT-एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेस (२०:४५ - ११:४०)

  • गाडी क्रमांक १२२२४ - एर्नाकुलम-LTT दुरांतो एक्स्प्रेस (१२:०० - ००:१०)

  • गाडी क्रमांक २२१५९ - LTT-तिरुनेलवेली एक्स्प्रेस (२०:४५ - ०९:००)

  • गाडी क्रमांक २२१६० - तिरुनेलवेली-LTT एक्स्प्रेस (०७:३० - १७:१५)

  • गाडी क्रमांक ११००३ - दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस (००:०५ - १२:४०)

  • गाडी क्रमांक ११००४ - सावंतवाडी रोड-दादर तुतारी एक्स्प्रेस (१७:५५ - ०६:४०)

  • गाडी क्रमांक १०१०५ - दिवा-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस (०६:२५ - १८:४५)

  • गाडी क्रमांक १०१०६ - सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेस (०८:४० - २०:१०)

  • गाडी क्रमांक ५०१०३ - दिवा-रत्नागिरी पॅसेंजर (१७:५० - ०२:००)

  • गाडी क्रमांक ५०१०४ - रत्नागिरी-दिवा पॅसेंजर (०५:५० - १३:२५)

  • गाडी क्रमांक २२१५० - पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस (१८:४५ - २१:५५)

  • गाडी क्रमांक २२१४९ - एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस (०२:१५ - १५:५०)

  • गाडी क्रमांक ११०७७ - पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस (२२:५० - ०३:१५)

  • गाडी क्रमांक ११०७८ - एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस (१८:५० - २३:००)

  • गाडी क्रमांक १२२०३ - नागपूर-मडगाव एक्स्प्रेस (१५:०५ - १७:४५)

  • गाडी क्रमांक १२२०४ - मडगाव-नागपूर एक्स्प्रेस (१९:०० - २१:२५)

पावसाळ्यात रेल्वे वेळापत्रकात तात्पुरते बदल

  • गाडी क्रमांक २२२२९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव वंदे भारत ही गाडी सध्या आठवड्यात सहा दिवस (शुक्रवार वगळता) धावते. पावसाळ्यात १५/०६/२०२६ ते १९/१०/२०२६ या कालावधीत ही गाडी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशा आठवड्यात तीन दिवस धावेल.

  • गाडी क्रमांक २२२३० मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत ही गाडी सध्या आठवड्यात सहा दिवस (शुक्रवार वगळता) धावते. १६/०६/२०२६ ते २०/१०/२०२६ या कालावधीत ती मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशा आठवड्यात तीन दिवस धावेल.

  • गाडी क्रमांक २२११९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव तेजस एक्स्प्रेस ही गाडी सध्या आठवड्यात पाच दिवस (मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार) धावते. १६/०६/२०२६ ते २०/१०/२०२६ या कालावधीत ती मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशा आठवड्यात तीन दिवस धावेल.

  • गाडी क्रमांक २२९२० मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही गाडी सध्या आठवड्यात पाच दिवस (सोमवार आणि गुरुवार वगळता) धावते. १७/०६/२०२६ ते १८/१०/२०२६ या कालावधीत ती बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशा आठवड्यात तीन दिवस धावेल.

  • गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस ही गाडी सध्या आठवड्यात चार दिवस (मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार) धावते. १९/०६/२०२६ ते १८/१०/२०२६ या कालावधीत ती शुक्रवार आणि रविवार अशा आठवड्यात दोन दिवस धावेल.

  • गाडी क्रमांक १११०० मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी सध्या आठवड्यात चार दिवस (मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार) धावते. २०/०६/२०२६ ते १९/१०/२०२६ या कालावधीत ती शनिवार आणि सोमवार अशा आठवड्यात दोन दिवस धावेल.

logo
marathi.freepressjournal.in