Mumbai : लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात; साखरझोपेत असताना २ चिमुकल्यांना अज्ञात वाहनाने चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

गणेशोत्सवाचा जल्लोष सर्वत्र सुरू असतानाच मुंबईतील लालबाग परिसरात शनिवारी पहाटे एक दुर्दैवी घटना घडली. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वी पहाटे एका अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले.
Mumbai : लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात; साखरझोपेत असताना २ चिमुकल्यांना अज्ञात वाहनाने चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
Published on

गणेशोत्सवाचा जल्लोष सर्वत्र सुरू असतानाच मुंबईतील लालबाग परिसरात शनिवारी पहाटे एक दुर्दैवी घटना घडली. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वी पहाटे एका अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. ही घटना लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर विरुद्ध मार्गावर घडली.

या अपघातात २ वर्षांच्या चंद्रा वजणदार या चिमूकलीचा मृत्यू झाला असून तिचा ११ वर्षीय भू शैलू वजणदार हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कशी घडली घटना?

ही दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला झोपली होती. पहाटे साखरझोपेत असतानाच ३ ते ४ च्या सुमारास एका वाहनाने त्यांना चिरडले. वाहनचालकाने तिथे थांबून मदत न करता त्याने गाडी घेऊन पळ काढला. तेथे उपस्थित भाविकांनी अपघाताचा आवाज ऐकताच घटनास्थळी धाव घेतली आणि मदत केली.

या घटनेनंतर काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून CCTV फूटेज तपासले जात असून आरोपीचा शोध सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in