मुंबई
मरीन लाईन्सजवळील नीलकंठ इमारतीला आग|Video
मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील नीलकंठ या ७ मजली निवासी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आज सकाळी १०:१५ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.
मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील नीलकंठ या ७ मजली निवासी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आज सकाळी १०:१५ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.
आग लागल्याचे लक्षात येताच इमारतीतील रहिवाशांनी तात्काळ सुरक्षित स्थळी धाव घेतली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या तात्काळ दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज आहे. मात्र, अग्निशमन व पोलिस विभागाकडून आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.
घटनेतील दिलासादायक बाब म्हणजे, आग लागलेल्या फ्लॅटमध्ये त्या वेळी कोणीही उपस्थित नव्हते. शिवाय, सर्व रहिवाशांना वेळेवर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.