मेहता-सरनाईक वाद चिघळला; सर्व तक्रारींची सखोल चौकशी करा, परिवहन मंत्र्यांचे आयुक्तांना पत्र

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मेहता-सरनाईक वाद चिघळला; सर्व तक्रारींची सखोल चौकशी करा, परिवहन मंत्र्यांचे आयुक्तांना पत्र
मेहता-सरनाईक वाद चिघळला; सर्व तक्रारींची सखोल चौकशी करा, परिवहन मंत्र्यांचे आयुक्तांना पत्र
Published on

मीरा- भाईंदर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रात त्यांनी केवळ स्वतःविरोधातील नव्हे, तर आमदार नरेंद्र मेहता त्यांची कंपनी, निकटवर्तीय व संबंधित घटकांविरोधातील सर्व तक्रारींवर सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मेहता-सरनाईक वाद चिघळला; सर्व तक्रारींची सखोल चौकशी करा, परिवहन मंत्र्यांचे आयुक्तांना पत्र
...तर मंत्री सरनाईक माझे ड्रायव्हर असते- नरेंद्र मेहता

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या जनसंपर्क कार्यालयात ‘जनता दरबार’ आयोजित करून विविध तक्रारी समोर आणल्या होत्या.

मेहता-सरनाईक वाद चिघळला; सर्व तक्रारींची सखोल चौकशी करा, परिवहन मंत्र्यांचे आयुक्तांना पत्र
Mira-Bhayandar : भाजपा पाठोपाठ शिंदे गट देखील आक्रमक; आमदार नरेंद्र मेहतांना तडीपार करण्यासह गुन्हा दाखल करण्याची मागणी

अनुपालन अहवाल

त्यांनी महापालिका प्रशासनाला निर्देश दिले आहेत की, ७११ कंपनी आमदार मेहता यांचे निकटवर्तीय, बंधू विनोद मेहता तसेच संबंधित नगरसेवकांविरोधातील सर्व प्रलंबित तक्रारींची सखोल तपासणी करण्यात यावी. तसेच, त्यांच्या आगामी लोकदरबारापूर्वी सर्व तक्रारींचा वस्तुनिष्ठ ‘अनुपालन अहवाल’ सादर करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in