१७३ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव; आजपासून प्रक्रिया: अंतिम निकाल २० मार्चला

म्हाडाचा विभागीय घटक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुंबई शहर आणि उपनगर क्षेत्रातील १६ निवासी वसाहतींमधील १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता इ लिलाव...
१७३ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव; आजपासून प्रक्रिया: अंतिम निकाल २० मार्चला

मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुंबई शहर आणि उपनगर क्षेत्रातील १६ निवासी वसाहतींमधील १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता इ लिलाव ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवार, १ मार्चपासून अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील प्रतीक्षा नगर-सायन येथील १५, न्यू हिंद मिल-माझगाव येथील २, स्वदेशी मिल कुर्ला येथील ५, गव्हाणपाडा-मुलुंड येथील ८,तुंगा पवई येथील ३, कोपरी पवई येथील ५, मजासवाडी-जोगेश्वरी येथील १, शास्त्री नगर गोरेगांव येथील १, सिद्धार्थ नगर गोरेगांव येथील १, बिंबिसार नगर गोरेगांव येथील १७, मालवणी मालाड येथील ५७, चरकोप येथील ३४, जुने मागाठणे येथील १२, महावीर नगर कांदिवली येथील १२ अशा एकूण १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता ई-लिलावाचे नियोजन करण्यात आले आहे. इच्छुक अर्जदार इ लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावरून नोंदणी करणे, अर्ज करणे, कागदपत्र अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादी प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. ऑनलाईन ई-लिलाव प्रक्रिया १४ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. १४ मार्च रोजी रात्री ११.५९ नंतर या इ-लिलाव सोडतीत सहभाग घेण्यासाठीची लिंक निष्क्रिय करण्यात येणार आहे. ­

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in