Mumbai : म्हाडाची फाईल चोरीला; खेरवाडी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

म्हाडाच्या मुख्यालयातील कोकण मंडळाच्या मिळकत १ यांच्या व्यवस्थापक कार्यालयातील फाइल चोरीस गेली आहे. याप्रकरणी वांद्रे खेरवाडी अज्ञात पोलीस ठाण्यात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai : म्हाडाची फाईल चोरीला; खेरवाडी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Mumbai : म्हाडाची फाईल चोरीला; खेरवाडी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Published on

मुंबई : म्हाडाच्या मुख्यालयातील कोकण मंडळाच्या मिळकत १ यांच्या व्यवस्थापक कार्यालयातील फाइल चोरीस गेली आहे. याप्रकरणी वांद्रे खेरवाडी अज्ञात पोलीस ठाण्यात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील पाचपाखाडी येथील भूखंड क्रमांक ६७ची महत्त्वाची फाइल उपलब्ध होत नसल्याने खळबळ उडाली. १९९० ते २०२३ या कालावधीत संबंधित फाइल अज्ञात व्यक्तीने गहाळ केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाईची मागणी करण्यात आली आहे. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत जयराजा पुत्रण यांनी २३ मार्च २०२३ रोजी भूखंड क्रमांक ६७ व ६८शी संबंधित कागदपत्रांची मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन जनमाहिती अधिकाऱ्यांनी कार्यालयातील सार्वजनिक अभिलेख तपासले. मात्र भूखंड क्रमांक ६७ची फाईल सापडली नाही.

या प्रकरणात दुसरे अपील राज्य माहिती आयोग, बृहन्मुंबई खंडपीठासमोर सुरू आहे. आयोगाने संबंधित नस्तीचा शोध घेऊन ती उपलब्ध न झाल्यास महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियमाच्या तरतुदीनुसार पोलिसांत एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, म्हाडाचे विद्यमान प्राधिकृत अधिकारी श्याम मोरे यांनी नस्तीचा शोध घेतला असता भूखंड क्रमांक ६८ची स्कॅन प्रत उपलब्ध झाली. मात्र भूखंड क्रमांक ६७ची मूळ नस्ती अथवा संबंधित कागदपत्रे सापडली नाहीत. फाईल शोधण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागण्यात आली होती. त्यानुसार माहिती आयोगाने पुढील सुनावणी २२ जुलै २०२६पर्यंत तहकूब केली.

मात्र, २१ जुलैपर्यंतही फाइल उपलब्ध न झाल्याने मोरे यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. संबंधित फाइल नेमकी कधी, कशी आणि कोणाच्या ताब्यातून गायब झाली, याचा तपास आता पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट होणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in