गुड न्यूज! 'म्हाडा'च्या लॉटरीतील घरांच्या किंमती झाल्या कमी; अर्ज करण्याचीही मुदत वाढवली

लॉटरीमधील घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी विविध स्तरातून होत होती. जास्त किंमतीमुळे अर्ज भरण्याकडे इच्छुकांनी पाठ फिरवली होती. आता अखेर...
गुड न्यूज! 'म्हाडा'च्या लॉटरीतील घरांच्या किंमती झाल्या कमी; अर्ज करण्याचीही मुदत वाढवली
Published on

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत २ हजार ३० घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी विविध स्तरातून होऊ लागल्याने अखेर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विकास नियंत्रण नियमावली ३३(७) आणि ३३ (५) या इमारतींच्या पुनर्विकासातून खाजगी विकासकांकडून म्हाडाला प्राप्त झालेल्या ३७० घरांच्या किंमती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत १९ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या लॉटरीत गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ अशा विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांतील घरांचा समावेश आहे. या लॉटरीतील घरांच्या कोट्यवधी रुपयांचा किंमतीमुळे अर्ज भरण्याकडे इच्छुकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे या घरांच्या किमती कमी करण्याबाबत मंडळाकडून विचार सुरू होता.

म्हाडाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी जनसंवाद प्रामुख्याने सुलभ व पारदर्शक राहावा, या उद्देशाने म्हाडातर्फे शुभंकर चिन्हाचे अनावरण राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज म्हाडा मुख्यालयात करण्यात आले.

यावेळी त्यांनी लॉटरीतील विकास नियंत्रण नियमावली ३३(७) आणि ३३ (५) या इमारतींच्या पुनर्विकासातून खाजगी विकासकांकडून म्हाडाला प्राप्त झालेल्या ३७० घरांच्या किंमती करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा योजनेतील तब्बल १६६० घरांच्या किंमती जैसे थे ठेवल्या आहेत.

किंमतीत किती घट?

अत्यल्प उत्पन्न गट : २५%

अल्प उत्पन्न गट : २०%

मध्यम उत्पन्न गट : १५%

उच्च उत्पन्न गट : १०%

logo
marathi.freepressjournal.in