म्हाडाची मुंबईत ४०८३ घरांची लॉटरी, १८ जुलैला सोडत

ही परवडणारी घरे सर्व उत्पन्न गटातील नागरिकांसाठी असतील. त्यात आर्थिकदृष्ट्या मागास, कमी उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट आदींचा समावेश
म्हाडाची मुंबईत ४०८३ घरांची लॉटरी, १८ जुलैला सोडत
Published on

मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांना म्हाडाने खुशखबर दिली आहे. चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर म्हाडातर्फे मुंबईत तब्बल ४०८३ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीची सोडत १८ जुलै रोजी निघणार आहे.

म्हाडाच्या घरांची जाहिरात सोमवारी काढली जाणार आहे. ही परवडणारी घरे सर्व उत्पन्न गटातील नागरिकांसाठी असतील. त्यात आर्थिकदृष्ट्या मागास, कमी उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट आदींचा समावेश आहे.

गोरेगाव (प.) लिंक रोड, ॲँटॉप हिल, कन्नमवार नगर, सिद्धार्थ नगर (गोरेगाव प.), गायकवाड नगर, मालाड, चारकोप, विक्रोळी, मानखुर्द, मागाठणे (बोरिवली), टिळक नगर-चेंबूर, जुहू विलेपार्ले, अंधेरी (प.), अंधेरी (पू.), कांदिवली, सहकार नगर, चेंबूर, पवई, सायन, विलेपार्ले (प.), लोअर परेल येथे ही घरे असतील.

ही परवडणारी घरे लॉटरीद्वारे विकली जातील. ही लॉटरी १८ जुलै रोजी रंगशारदा सभागृह, वांद्रे (प.) येथे होणार आहे. १० मे रोजी म्हाडातर्फे मुंबई महानगर प्रदेशात घरांसाठी लॉटरी काढणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in