

मुंबई : मुंबईतील मिठी नदीच्या गाळ उपसण्याच्या रखडलेल्या कामासाठी अखेर कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून रविवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात कुर्ला, एलबीएस मार्ग आणि चुनाभट्टी यांसारख्या सखल भागांत होणारी पाणीकोंडी रोखण्यासाठी मिठी नदीतील गाळ काढणे अत्यंत आवश्यक असते. या कामासाठी पालिकेने काढलेल्या पहिल्या दोन निविदांना प्रतिसाद मिळाला नव्हता; मात्र, तिसऱ्या प्रयत्नात कंत्राटदार मिळाल्याने या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शनिवारी या कामाचा आढावा घेऊन यंत्रणा पूर्ण क्षमतेने पालिकेकडून १४ 'ट्रॅश बूम' तैनात केले जाणार आहेत. मोगरा, राबवण्याचे आदेश दिले आहेत.
नद्या आणि समुद्रात जाणारा तरंगता कचरा रोखण्यासाठी मजास, मानखुर्द, सोमय्या, वाकोला आणि दादर-धारावी या नाल्यांमध्ये प्राधान्याने ट्रॅश बूम लावून कचरा अडवला जाईल. ज्यामुळे पाणी उपसा करणे सोपे होणार आहे. आयुक्तांनी उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना स्वतः घटनास्थळी भेट देऊन कामावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पारदर्शकता राखण्यासाठी नगरसेवक आणि प्रभाग समिती अध्यक्षांना नियमित अपडेट्स देण्याच्या व त्यांच्यासोबत संयुक्त पाहणी दौरे आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
गाळ उपशावर 'एआय'चे लक्ष
अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व मोठ्या नाल्यांमधील गाळ उपसण्याचे वेळापत्रक निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. गाळ उपसण्याच्या कामाच्या चित्रफितींचे विश्लेषण करण्यासाठी या वर्षी 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामुळे कामाबाबत पूर्ण पारदर्शकता राखण्यास मदत होणार असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.