पैसे भारतातून, मदत पाकिस्तानला? तुर्कस्तानच्या कंपनीवर शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

अलीकडेच पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यांमध्ये तुर्कीने पाकिस्तानला ड्रोनच्या माध्यमातून मदत केल्याचे वृत्त समोर आले. या नंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
पैसे भारतातून, मदत पाकिस्तानला? तुर्कस्तानच्या कंपनीवर शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
Published on

मुंबई : अलीकडेच पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यांमध्ये तुर्कीने पाकिस्तानला ड्रोनच्या माध्यमातून मदत केल्याचे वृत्त समोर आले. या नंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी सोमवारी एमआयएएल (मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) अधिकाऱ्यांची भेट घेऊन, मुंबई विमानतळावरील तुर्कस्तानची कंपनी सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया यांच्या सोबतचा करार त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे.

शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, सेलेबी हे सध्या मुंबई विमानतळावरील सुमारे ७०% ग्राउंड हँडलिंगचे काम पाहते. “तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन पुरवून भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण केला आहे. अशा देशातील कंपन्यांना भारतात व्यवसाय करू देणे ही राष्ट्रविरोधी गोष्ट ठरेल. आम्ही MIAL ला सांगितले आहे की त्यांनी तातडीने तुर्की कंपनीचा करार रद्द करावा. त्यासाठी आम्ही त्यांना १० दिवसांचा वेळ दिला आहे,” असे मुरजी पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

'भारताकडून पैसे कमवून पाकिस्तानला मदत करू नका'

पटेल यांनी पुढे स्पष्ट केले की, “तुर्कीच्या कंपन्या भारतातून नफा कमवतात आणि तोच पैसा पाकिस्तानसारख्या देशाला मदत करण्यासाठी वापरला जातो, हे आम्ही सहन करणार नाही. शिवसेना अशा कंपन्यांना महाराष्ट्रात व्यवसाय करू देणार नाही.”

पोलीस आयुक्तांनाही माहिती

या संपूर्ण घडामोडीबाबत मुरजी पटेल यांनी मुंबई पोलिस आयुक्तांचीही भेट घेतली असून, त्यांनी राज्यातील कोणत्याही तुर्की कंपनीला कंत्राट मिळू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in