पावसाळी आजाराचे थैमान! रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ; मुंबईत साथीचे आजार बळावले

मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात मान्सूनच्या पहिल्या दमदार बॅटिंगनंतर हंगामी आजारांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
पावसाळी आजाराचे थैमान! रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ; मुंबईत साथीचे आजार बळावले
पावसाळी आजाराचे थैमान! रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ; मुंबईत साथीचे आजार बळावले'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

अमित श्रीवास्तव/मुंबई

मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात मान्सूनच्या पहिल्या दमदार बॅटिंगनंतर हंगामी आजारांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये दैनंदिन ओपीडी रुग्णांच्या संख्येत २० ते ३० टक्क्यांची वाढ नोंदवली जात आहे.

यामध्ये प्रामुख्याने हंगामी व्हायरल इन्फेक्शन, इन्फ्लूएंझासारखे आजार, गॅस्ट्रो तसेच डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइडच्या सुरुवातीच्या रुग्णांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसानंतर ही रुग्णसंख्या प्रकर्षाने समोर आली असून रुग्णांमध्ये ताप, खोकला, घशात खवखव, अंगदुखी आणि थकवा अशी लक्षणे दिसत आहेत. यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींना सर्वाधिक फटका बसला आहे.

कामावर जाणाऱ्या प्रौढ व्यक्तींमध्येही ही वाढ लक्षणीय असून घाटकोपर येथील ‘झायनोव्हा शालबी हॉस्पिटल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रेनी वर्गीस यांनी सांगितले की, “गेल्या तीन ते चार दिवसांत व्हायरल इन्फेक्शन असलेल्या २२ ते ६५ वयोगटातील रुग्णांमध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे. हात स्वच्छ ठेवणे, हायड्रेटेड राहणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, उकळलेले पाणी पिणे, ताज्या घरगुती अन्नाचे सेवन करणे आणि लक्षणे दोन दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास वैद्यकीय उपचार घेणे, असा सल्ला मी मुंबईकर नागरिकांना देत आहे.”

पावसाळी आजाराचे थैमान! रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ; मुंबईत साथीचे आजार बळावले
Mumbai Rain Alert : पावसाळ्यात आरोग्याची घ्या काळजी; BMC कडून लेप्टोस्पायरोसिसच्या सूचना

बालरोग आपत्कालीन विभागांमध्येही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मुंबईतील ‘नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल’चे इमर्जन्सी मेडिसिनचे असोसिएट कन्सल्टंट डॉ. बेहझाद भंडारी यांनी सांगितले की, “मान्सूनच्या सुरुवातीपासून रुग्णालयाला भेट देणाऱ्या मुलांमध्ये ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. बहुतेक मुले हंगामी संसर्ग आणि मान्सूनशी संबंधित आजारांनी ग्रस्त असून बहुतांश प्रकरणे गंभीर नसली तरी गुंतागुंत टाळण्यासाठी लवकर सल्लामसलत आणि प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहे.”

ठाण्यातील ‘ज्युपिटर हॉस्पिटल’चे इंटर्नल मेडिसिनचे संचालक डॉ. अमित सराफ यांनी सांगितले की, “तीव्र पावसानंतर गेल्या दोन ते तीन दिवसांत ओपीडी सल्ल्यांमध्ये २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.”

पावसाळी आजाराचे थैमान! रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ; मुंबईत साथीचे आजार बळावले
Mumbai : पावसाची उसंत! आजारांचा धोका; मलेरिया, डेंग्यू, लेप्टो आदींची साथ बळावण्याची भीती, विहार तलाव ओसंडून वाहू लागला

रुग्णांमध्ये ही लक्षणे

बहुतेक रुग्णांमध्ये ताप, श्वास घेण्यास अडचणी निर्माण होणे, श्वसनमार्गाचा संसर्ग, घशात खवखव, खोकला यांसारखी लक्षणे दिसत आहेत. त्याचबरोबर हंगामी व्हायरल इन्फेक्शन, गॅस्ट्रो आणि संशयित डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. अचानक हवामान बदल आणि उच्च आर्द्रतेमुळे दमा, आतड्यांमधील आजार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in