Mumbai : एसी लोकलखालून धूर अन् ठिणग्या; घाटकोपर स्थानकात नेमकं काय घडलं? Video

मुंबईतील घाटकोपर स्थानकात डोंबिवलीकडे जाणाऱ्या एसी लोकलच्या चाकांतून ठिणग्या आणि धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
Mumbai : एसी लोकलखालून धूर अन् ठिणग्या; घाटकोपर स्थानकात नेमकं काय घडलं? Video
Mumbai : एसी लोकलखालून धूर अन् ठिणग्या; घाटकोपर स्थानकात नेमकं काय घडलं? VideoX
Published on

काही दिवसांपूर्वी मुलुंड स्थानकात एसी यंत्रणेत बिघाड झाल्याने एसी लोकलमध्ये प्रवाशांचा अक्षरशः जीव गुदमरल्याची घटना घडली होती. त्या घटनेची चर्चा सुरू असतानाच आता घाटकोपर स्थानकात आणखी एका एसी लोकलच्या चाकांमधून ठिणग्या उडताना आणि धूर निघताना दिसल्याने प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली. मात्र, हा आगीचा प्रकार नसून ब्रेक बाइंडिंगमुळे ठिणग्या उडून धूर निर्माण झाल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

'लोकमत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, डोंबिवलीकडे जाणारी एसी लोकल शुक्रवारी (दि.१७) घाटकोपर स्थानकात दाखल होताच तिच्या चाकांजवळून ठिणग्या उडताना आणि धूर निघताना दिसला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धूर दिसताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गाडीची तपासणी केली.

तपासणीनंतर ब्रेक बाइंडिंगमुळे चाकांजवळ ठिणग्या उडून धूर निर्माण झाला होता. हा आगीचा प्रकार नव्हता, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तांत्रिक बिघाड तातडीने दूर करण्यात आला असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झाल्याची नोंद नाही.

काही दिवसांपूर्वी एसी बंद पडल्याने प्रवाशांचा गुदमरला होता जीव

यापूर्वी १३ जुलै रोजी टिटवाळा-सीएसएमटी एसी लोकलची वातानुकूलन यंत्रणा मुलुंड स्थानकात अचानक बंद पडली होती. सुमारे १५ मिनिटे लोकल खोळंबल्याने डब्यांमध्ये उष्णता वाढली आणि हवा खेळती नसल्याने अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला होता. काही प्रवाशांना तातडीने डब्याबाहेर काढावे लागले, तर एका प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Mumbai : एसी लोकलखालून धूर अन् ठिणग्या; घाटकोपर स्थानकात नेमकं काय घडलं? Video
Mumbai : एसी लोकलमध्ये प्रवाशांचा गुदमरला जीव; तांत्रिक बिघाडामुळे १५ मिनिटे मुलुंड स्थानकात खोळंबा, Video

सलग काही दिवसांत एसी लोकलशी संबंधित या दोन घटनांमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, एसी लोकलच्या तांत्रिक देखभाल आणि सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in