Mumbai : पालिकेच्या अनुज्ञापन निरीक्षकाला अटक; सापडली ४५.८१ लाखांची बेहिशेबी मालमत्ता!

मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम विभागातील तत्कालीन अनुज्ञापन निरीक्षक विनाश कांबळे यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.
Mumbai : पालिकेच्या अनुज्ञापन निरीक्षकाला अटक; सापडली ४५.८१ लाखांची बेहिशेबी मालमत्ता!
Mumbai : पालिकेच्या अनुज्ञापन निरीक्षकाला अटक; सापडली ४५.८१ लाखांची बेहिशेबी मालमत्ता!'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम विभागातील तत्कालीन अनुज्ञापन निरीक्षक विनाश कांबळे यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. उत्पन्नापेक्षा २७.६५ टक्के अधिक म्हणजेच ४५ लाख ८१ हजार ४६० रुपयांची संपत्ती जमवल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली.

Mumbai : पालिकेच्या अनुज्ञापन निरीक्षकाला अटक; सापडली ४५.८१ लाखांची बेहिशेबी मालमत्ता!
Kurla Couple Assault Case : उद्यानाच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका; बाजार व उद्यान समिती अध्यक्ष आक्रमक

कांबळे हे के-पश्चिम विभागातील वरिष्ठ निरीक्षक, अनुज्ञापन कार्यालयात कार्यरत होते. या आधी त्यांच्यावर झालेल्या सापळा कारवाईनंतर करण्यात आलेल्या झडतीतून बेहिशेबी मालमत्तेबाबत चौकशी सुरू करण्यात आली होती. १७ जुलै १९९६ ते २३ डिसेंबर २०१९ या कालावधीतील उत्पन्न आणि मालमत्तेची तपासणी करण्यात आली. या चौकशीत कांबळे यांनी भ्रष्ट आणि गैरमार्गाने ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचे उघड झाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)