Mumbai : सह्याद्री राज्य अतिथीगृहाजवळ अपघात; बस-कारच्या धडकेत पादचारी महिलेचा जागीच मृत्यू

मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहाजवळ आज (दि. १२) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला.
Mumbai : सह्याद्री राज्य अतिथीगृहाजवळ अपघात; बस-कारच्या धडकेत पादचारी महिलेचा जागीच मृत्यू
Published on

मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहाजवळ आज (दि. १२) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली आणि या कारच्या शेजारी उभ्या असलेल्या महिलेचा बस आणि कारच्या मध्ये चिरडून मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, बेस्ट इलेक्ट्रिक बस सह्याद्री अतिथीगृहासमोरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस थेट रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारवर आदळली. त्या वेळी कारच्या शेजारी उभी असलेली महिला बस व कारच्या मध्ये अडकली. घटनेत महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिला तात्काळ जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

ही महिला दक्षिण मुंबईतील रहिवासी असून ती मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, मृत महिलेची ओळख पटवण्याचे आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

सह्याद्री अतिथीगृहासमोर झालेल्या या अपघातामुळे सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in