Mumbai : मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर कारवाई सुरू; दोन दिवसांत २०५ आस्थापनांना 'ऑन दि स्पॉट नोटीस', ६ हजारांहून अधिक आस्थापनांची झाडाझडती

मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे, असे वारंवार सांगूनही दुर्लक्ष करणे मुंबईतील आस्थापनाच्या अंगलट आले आहे.
Mumbai : मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर कारवाई सुरू; दोन दिवसांत २०५ आस्थापनांना 'ऑन दि स्पॉट नोटीस', ६ हजारांहून अधिक आस्थापनांची झाडाझडती
Mumbai : मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर कारवाई सुरू; दोन दिवसांत २०५ आस्थापनांना 'ऑन दि स्पॉट नोटीस', ६ हजारांहून अधिक आस्थापनांची झाडाझडती'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे, असे वारंवार सांगूनही दुर्लक्ष करणे मुंबईतील आस्थापनाच्या अंगलट आले आहे. मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देणार, असा इशारा देत विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी ग्राऊंड झिरोवर दोन दिवसांत ६ हजार ३२३ आस्थापनांची झाडाझडती घेतली. यात २०५ आस्थापनांवर ठळकपणे दिसतील अशा देवनागरी लिपीत मराठी पाट्या नव्हत्या. त्यामुळे २०५ आस्थापनांना 'ऑन दि स्पॉट नोटीस' बजावण्यात आल्याची माहिती विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. मात्र, मुंबईत ५,०२० आस्थापनांनी मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ज्या आस्थापनावर मराठी भाषेत देवनागरी लिपीत ठळक अक्षरात फलक ठळकपणे दिसतील, अशा पाट्या नसतील तर पाहणी करून ऑन दी स्पॉट नोटीस बजावा, असे निर्देश दीक्षा कारकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. पुढील काही दिवसांत ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.

Mumbai : मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर कारवाई सुरू; दोन दिवसांत २०५ आस्थापनांना 'ऑन दि स्पॉट नोटीस', ६ हजारांहून अधिक आस्थापनांची झाडाझडती
मराठी पाट्या लावण्याचा नियम सर्रास धाब्यावर; ३ हजारांहून अधिक आस्थापनांना न्यायालयाचा दणका; १ कोटी ९१ लाखांचा दंड वसूल

रस्ते, मुख्य रस्ते येथील दर्शनी भागात पाहणी

१४ मे रोजी मुंबई महापालिकेच्या ए विभाग कार्यालय क्षेत्रात विशेष सामूहिक धडसत्रामध्ये मुख्यत्वे महत्त्वाचे रस्ते, मुख्य रस्ते येथील दर्शनी भागात असलेल्या आस्थापनाची पाहणी करून ज्या ज्या आस्थापनांनी मराठी भाषेत नामफलक लावलेली नाहीत अशा आस्थापनाधारकांविरुद्ध महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे, तर १५ मे रोजी पी दक्षिण विभाग कार्यालय क्षेत्रातील आस्थापनांच्या दर्शनी भागात असलेल्या आस्थापनाची पाहणी करून ज्या ज्या आस्थापनांनी मराठी भाषेत नामफलक लावलेली नाहीत अशा आस्थापनाधारकाविरुद्ध महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात आल्याचे कारकर यांनी सांगितले.

ए विभागातील कारवाई

  • एकूण भेटी दिलेल्या आस्थापना - ३,४५५

  • मराठी भाषेत नामफलक नसलेल्या आस्थापना - ११३

  • मराठी पाट्या लावण्यात आलेल्या मुंबईतील एकूण आस्थापना -३,३४२

पी-दक्षिण विभागातील कारवाई

  • एकूण भेटी दिलेल्या आस्थापना -२,८६८

  • मराठी भाषेत नामफलक नसलेल्या आस्थापना - ९२

  • मराठी पाट्या लावण्यात आलेल्या आस्थापना - २,७७६

logo
marathi.freepressjournal.in