मुंबईत प्रदूषण अलर्ट! अशा वातावरणात स्वतःची आणि कुटुंबाची कशी घ्याल काळजी?

गेल्या काही दिवसांत शहरातील AQI तब्बल १५० ते २५० च्या दरम्यान असून हवा धूसर आणि जड जाणवत आहे. अशा वेळी घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांत जळजळ, थकवा आणि डोकेदुखी यांसारखे त्रास सहज जाणवतात.
मुंबईत प्रदूषण अलर्ट! अशा वातावरणात स्वतःची आणि कुटुंबाची कशी घ्याल काळजी?
मुंबईत प्रदूषण अलर्ट! अशा वातावरणात स्वतःची आणि कुटुंबाची कशी घ्याल काळजी?
Published on

एथिओपियातील ज्वालामुखीचा धूर, धूळकण आणि हवामानातील बदल याचा परिणाम मुंबईच्या वातावरणावरही दिसतो आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील AQI तब्बल १५० ते २५० च्या दरम्यान असून हवा धूसर आणि जड जाणवत आहे. अशा वेळी घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांत जळजळ, थकवा आणि डोकेदुखी यांसारखे त्रास सहज जाणवतात. विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि ॲलर्जी-दमा असलेल्यांनी खास काळजी घेणं आवश्यक आहे.

या परिस्थितीत काही साध्या सवयी अंगीकारल्या तर स्वतःचं आणि कुटुंबाचं संरक्षण मोठ्या प्रमाणात करता येतं.

घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी

AQI जास्त असताना घराबाहेर पडणं शक्यतो टाळावंच. पण कामानिमित्त बाहेर जावं लागत असेल, तर पुढीलप्रमाणे काळजी घ्या...

  • N95 किंवा N99 मास्क नक्की घाला (सामान्य कापडी/सर्जिकल मास्क फारसे कामाचे नाहीत).

  • शक्य तितके सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ५ नंतर बाहेर पडणे टाळा - या वेळेत प्रदूषण जास्त असते.

  • डोळ्यांना त्रास होत असेल तर चष्मा (सनग्लासेस किंवा पॉवरचा) लावा; ते धुळीपासून संरक्षण करतात.

  • व्यायाम/जॉगिंग/सायकलिंग सध्या घरात किंवा बंद जिममध्ये करा.

  • दुचाकी/रिक्षात असाल तर मास्क वरून रुमाल/ओढणी बांधा - हवा थेट नाक-तोंडात जाणार नाही.

  • परफ्यूम, डीओ, अगरबत्ती, धूप कमी वापरा. त्यामुळे घरातच PM2.5 वाढते.

मुंबईत प्रदूषण अलर्ट! अशा वातावरणात स्वतःची आणि कुटुंबाची कशी घ्याल काळजी?
गुडघे आणि खांदे वाचवायचे असतील तर 'या' Exercises आजपासूनच बंद करा! आरोग्य तज्ज्ञांचा इशारा

घरात हवा स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त उपाय

  • खिडक्या-दारे सकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंत बंद ठेवा (सध्या बाहेरची हवा घरात येऊ देऊ नका).

  • घरात Air Purifier (HEPA + Activated Carbon फिल्टर असलेला) चालवा – विशेषतः झोपताना आणि लहान मुलांच्या खोलीत.

  • पंखे/कूलर बंद ठेवा; AC चालवायचा असल्यास recirculation mode ऑन करा.

  • घरात सिगारेट/विडी/हुक्का/अगरबत्ती/मॉस्किटो कॉइल पूर्ण बंद.

  • स्वयंपाक करताना चिमणी/एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा आणि गॅसऐवजी इंडक्शन/इलेक्ट्रिक कुकर वापरणे उत्तम.

शरीर आतून मजबूत ठेवण्यासाठी सवयी

  • दिवसभरात ३-४ लिटर पाणी प्या.

  • तुळस-आले-हळद-मिरी चहा, कढा किंवा हळद-दूध घ्या.

  • विटामीन C जास्त घ्या. - लिंबू पाणी, आवळा, संत्री, पेरू, ब्रोकोली.

  • स्टीम घ्या. (रोज ५-१० मिनिटे) - नाक-घसा स्वच्छ राहतो.

  • ज्यांना दमा/ॲलर्जी आहे त्यांनी इनहेलर/दवाखान्यातील औषध वेळेवर घ्या.

मुंबईत AQI वाढत असताना काळजी घेणे अत्यावश्यक आहे. या सवयींमुळे घरातील हवा अधिक स्वच्छ ठेवता येते आणि बाहेर पडतानाही शरीराला ७०–८०% संरक्षण मिळू शकतं.

मुंबईत प्रदूषण अलर्ट! अशा वातावरणात स्वतःची आणि कुटुंबाची कशी घ्याल काळजी?
मुंबईची हवा अजूनही खराबच; मनपा कडक कारवाई करण्याच्या तयारीत
logo
marathi.freepressjournal.in