Mumbai : बेस्ट बसमध्ये आता सुट्ट्या पैशांची कटकट संपणार? QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याचा प्रस्ताव

मुंबईच्या बेस्ट बसमध्ये आता यूपीआयने तिकीट काढता येणार? सुट्ट्या पैशांची कटकट दूर करण्यासाठी क्यूआर कोड पेमेंटचा प्रस्ताव. जाणून घ्या नवी सुविधा कधी सुरू होणार.
Mumbai : बेस्ट बसमध्ये आता सुट्ट्या पैशांची कटकट संपणार? QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याचा प्रस्ताव
Mumbai : बेस्ट बसमध्ये आता सुट्ट्या पैशांची कटकट संपणार? QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याचा प्रस्ताव'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : बेस्ट बसमधून प्रवास करताना अनेकदा तिकिटासाठी सुट्टे पैसे नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. कधी प्रवाशांकडे सुट्टे नसतात, तर कधी कंडक्टरकडे उरलेले पैसे परत देण्यासाठी सुट्टे नसतात. मात्र, आता ही कटकट लवकरच संपण्याची शक्यता आहे. मुंबईतील बेस्ट बसमध्ये तिकीट काढण्यासाठी थेट यूपीआय (UPI) पेमेंटची सुविधा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य झाल्यास प्रवाशांना मोबाईलवरून क्यूआर कोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे भरता येतील.

बेस्टच्या सर्व बसमध्ये UPI पेमेंट सुरू करण्याची मागणी

बेस्ट समितीचे सदस्य आणि भाजपचे मुंबई प्रवक्ते अजय सिंह यांनी बेस्ट प्रशासनाकडे ही मागणी केली आहे. आज चहाच्या टपरीपासून मोठमोठ्या दुकानांपर्यंत सर्वत्र यूपीआयने पैसे भरता येतात. बेंगळुरू, हैदराबाद, भुवनेश्वर आणि नागपूरमधील बससेवांमध्येही ही सुविधा उपलब्ध आहे. मग मुंबईच्या बेस्ट बसमध्ये प्रवाशांना यूपीआयने तिकीट काढण्याची सुविधा का मिळू नये, असा सवाल अजय सिंह यांनी उपस्थित केला आहे.

सुट्ट्या पैशांची कटकट संपणार?

बेस्टच्या नियमित प्रवाशांसाठी सध्या 'चलो' ॲप, स्मार्ट कार्ड आणि बसपास यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, अधूनमधून बसने प्रवास करणाऱ्या अनेकांकडे या सुविधा नसतात. त्यामुळे त्यांना रोख पैसे देऊनच तिकीट काढावं लागतं.

अनेकदा सुट्टे पैसे नसल्यामुळे प्रवासी आणि कंडक्टर दोघांचीही अडचण होते. कधी यावरून वादही होतात. यूपीआयची सुविधा सुरू झाल्यास प्रवाशांना क्यूआर कोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे भरता येतील. त्यामुळे सुट्टे पैसे शोधण्याची गरज कमी होईल आणि तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळही वाचेल.

Mumbai : बेस्ट बसमध्ये आता सुट्ट्या पैशांची कटकट संपणार? QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याचा प्रस्ताव
दिवाळीत गावी जाणं महागलं! खासगी बसच्या तिकीट दरांत थेट दुप्पट-तिप्पट वाढ, प्रवासी संतापले

बेस्ट प्रशासनालाही होणार फायदा

या सुविधेमुळे केवळ प्रवाशांनाच नाही, तर बेस्ट प्रशासनालाही फायदा होऊ शकतो. सध्या रोज जमा होणारी रोख रक्कम मोजणं, सांभाळणं आणि बँकेत जमा करणं यासाठी वेळ आणि खर्च करावा लागतो. डिजिटल पेमेंटमुळे हे काम कमी होऊ शकतं.

Mumbai : बेस्ट बसमध्ये आता सुट्ट्या पैशांची कटकट संपणार? QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याचा प्रस्ताव
UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

UPI सुविधा कधीपासून सुरू होणार?

माध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी या मागणीचा विचार करून प्रस्ताव तयार करण्याबाबत सांगितलं आहे.

मात्र, बेस्टच्या बसमध्ये यूपीआय पेमेंटची सुविधा सुरू करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही सुविधा नेमकी कधीपासून सुरू होणार, हे स्पष्ट झालेलं नाही. प्रशासनाने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतरच प्रवाशांना हा नवा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)