Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई

वायूप्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या कोळसा आणि लाकूड जाळणाऱ्या बेकऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपूनही स्वच्छ इंधनाकडे वापरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ८८ बेकऱ्यांना महापालिकेने अंतिम नोटिसा बजावल्या...
Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई
Published on

मुंबई : वायूप्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या कोळसा आणि लाकूड जाळणाऱ्या बेकऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपूनही स्वच्छ इंधनाकडे वापरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ८८ बेकऱ्यांना महापालिकेने अंतिम नोटिसा बजावल्या असून, तातडीने पीएनजी, एलपीजी किंवा विद्युत ओव्हनचा वापर सुरू न केल्यास संबंधित बेकऱ्यांवर बंदीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई
Mumbai : पाणीचोरीला बसणार आळा! टँकरच्या प्रत्येक थेंबावर BMC ची डिजिटल नजर

पालिकेच्या पर्यावरण विभागाने शहरातील ५९२ बेकऱ्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये २०९ बेकऱ्यांनी आधीच स्वच्छ इंधनाचा स्वीकार केला आहे. मात्र ८८ बेकऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नसल्याचे समोर आले आहे. या बेकऱ्यांना आता अंतिम संधी देण्यात आली असून त्यानंतर थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in