

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयात असलेल्या उपाहारगृहात पालिका अधिकारी, कर्मचारी, पोलीस, अभ्यासगत असे हजारो लोकांची ये-जा सुरू असते. मात्र उपाहारगृहाने लोकांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. ताकाच्या ग्लासात चक्क माशी तर कांदा भजीत प्लास्टिकचा धागा ३ जुलै रोजी सापडला होता. उपाहारगृहात कमल कॅटरस प्रा. लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाचे निष्काळजीपणामुळे हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे.
मुंबई महापालिका मुख्यालयात कमल कॅटरस प्रा. लिमिटेड कंपनी उपाहारगृहाचे व्यवस्थापन बघते. पालिका मुख्यालयात पाच हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. उपाहारगृहात जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पोलिसांसह अनेक मंडळी येत असतात. मात्र उपाहारगृहात अस्वच्छता, खाद्यपदार्थ उघडे ठेवणे यामुळे येणाऱ्याच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत कमल कॅटरसचे व्यवस्थापक यांनी जास्त काही न बोलता अशी चूक पुन्हा होणार नाही, असे आश्वासन दिले.