Mumbai : सहा मजली नव्या सभागृहाचा प्रस्ताव रखडला; बांधकाम क्षेत्रफळाच्या उल्लेखाअभावी प्रस्ताव मागे

मुंबई पालिकेच्या नव्या सभागृहाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पुन्हा एकदा विलंब झाला आहे.
Mumbai : सहा मजली नव्या सभागृहाचा प्रस्ताव रखडला; बांधकाम क्षेत्रफळाच्या उल्लेखाअभावी प्रस्ताव मागे
Mumbai : सहा मजली नव्या सभागृहाचा प्रस्ताव रखडला; बांधकाम क्षेत्रफळाच्या उल्लेखाअभावी प्रस्ताव मागे
Published on: 

मुंबई : मुंबई पालिकेच्या नव्या सभागृहाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पुन्हा एकदा विलंब झाला आहे. महापालिका मुख्यालयासमोरील क्रीडाभवनाच्या जागेवर आझाद मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ सहा मजली अत्याधुनिक सभागृह उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला होता. मात्र, बांधकामाच्या वाढीव क्षेत्रफळाचा प्रस्तावात उल्लेख नसल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेतला आहे.

महापालिका मुख्यालयासमोरील क्रीडाभवनाची इमारत जीर्ण झाल्याने त्या जागेवर टाऊन हॉल आणि जिमखाना उभारण्याची योजना प्रशासनाने आखली होती. त्याचा प्रस्ताव मार्चमध्ये स्थायी समितीसमोर मांडला होता. मात्र, प्रस्तावातील त्रुटींमुळे सत्ताधाऱ्यांनी तो प्रशासनाकडे परत पाठवला. त्यानंतर मूळ संकल्पनेत बदल करून या जागेवर महापालिकेचे नवीन सभागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

भविष्यात प्रभागरचना आणि लोकसंख्येतील वाढ लक्षात घेता सदस्यसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेऊन नव्या सभागृहात ३३० ते ३५० सदस्यांच्या आसनक्षमतेचे नियोजन करण्यात आले आहे.

४४ कोटींपर्यंत खर्च जाणार

प्रकल्पासाठी सुमारे ३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून करांसह ही रक्कम सुमारे ४४ कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. मात्र, बांधकामाचे क्षेत्रफळ वाढले असतानाही त्याचा स्पष्ट उल्लेख प्रस्तावात केला नाही. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव प्रस्ताव मागे घेऊन सुधारित प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)