Mumbai : नव्या सभागृहाचा मार्ग मोकळा! ३२९ नगरसेवकांसाठी प्रशस्त सभागृह उभारण्यास स्थायीची मंजुरी

मुंबई महापालिकेच्या सध्याच्या सभागृहातील अपुरी आसनव्यवस्था आणि जागेची कमतरता दूर करण्यासाठी प्रस्तावित नव्या अत्याधुनिक सभागृहाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Mumbai : नव्या सभागृहाचा मार्ग मोकळा! ३२९ नगरसेवकांसाठी प्रशस्त सभागृह उभारण्यास स्थायीची मंजुरी
Mumbai : नव्या सभागृहाचा मार्ग मोकळा! ३२९ नगरसेवकांसाठी प्रशस्त सभागृह उभारण्यास स्थायीची मंजुरीसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सध्याच्या सभागृहातील अपुरी आसनव्यवस्था आणि जागेची कमतरता दूर करण्यासाठी प्रस्तावित नव्या अत्याधुनिक सभागृहाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला एकमताने मंजुरी देण्यात आली. नव्या सभागृहात ३२९ नगरसेवकांची आसनव्यवस्था असून भविष्यात ती ३५० पर्यंत वाढविण्याची तरतूद आहे. मात्र, सभागृहाच्या बांधकाम क्षेत्रफळातील वाढ, निविदा खर्च, अवघ्या ७० वाहनांसाठी असलेली पार्किंग व्यवस्था आणि हेरिटेज परिसरातील बांधकाम अशा अनेक मुद्द्यांवर सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महापालिकेच्या सभागृहात सादर करण्यात येणार आहे.

बैठकीत नवीन सभागृहाचे सादरीकरण करण्यात आले. भाजपचे तेजिंदर तिवाना यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शक्यतो पिलरलेस सभागृह उभारण्याची सूचना केली. भाजपचे गणेश खणकर यांनी सध्याच्या सभागृहातील मर्यादित आसनव्यवस्थेकडे लक्ष वेधत नव्या सभागृहात ३२९ सदस्यांची क्षमता असेल, अशी माहिती दिली. आपत्कालीन परिस्थितीत आठ ते दहा मिनिटांत सर्व सदस्यांना बाहेर पडता येईल, अशी व्यवस्था तसेच तीन लिफ्ट उपलब्ध असतील. नव्या सभागृहात विधानसभेप्रमाणे अत्याधुनिक सुविधा असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी जुन्या आणि नव्या इमारतींना जोडणारा कनेक्टिंग ब्रिज उभारण्याची सूचना केली. एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी बांधकाम क्षेत्रफळ आणि खर्चवाढीवर प्रश्न उपस्थित केले. पूर्वी ४,७१९ चौरस मीटर क्षेत्रफळासाठी निविदा काढण्यात आली होती.

असे असेल नवीन सभागृह

  • बेसमेंट : वाहनतळ

  • तळमजला : प्रवेशद्वार लॉबी आणि गॅलरी हॉल

  • पोडियम १ : पार्किंग

  • पोडियम २ : बॅडमिंटन कोर्ट आणि पार्किंग

  • तिसरा मजला : जिमखाना आणि इनडोअर क्रीडा सुविधा

  • चौथा मजला : रिसेप्शन, वेटिंग रूम, कॉन्फरन्स हॉल, कार्यालय, डायनिंग हॉल आणि कॅफेटेरिया

  • पाचवा व सहावा मजला : मुख्य सभागृह

  • सभागृहाची क्षमता : ३२९ नगरसेवक; भविष्यात ३५० पर्यंत वाढविण्याचे नियोजन.

  • पार्किंग : सुमारे ७० वाहनांची व्यवस्था.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)