Mumbai : चेंबूर येथील दुर्घटनेत आणखी दोघांचा मृत्यू

चेंबूर येथील सुभाषनगर परिसरातील तळ अधिक सात मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावर काम सुरू असताना २८ फेब्रुवारीला परांची कोसळून सहा कामगार खाली पडले होते. या घटनेत रामूल्ला (५५) यांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले होते. जखमींपैकी आणखी दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून बुधवारी देण्यात आली आहे.
चेंबूर येथील दुर्घटनेत आणखी दोघांचा मृत्यू
चेंबूर येथील दुर्घटनेत आणखी दोघांचा मृत्यू
Published on

मुंबई : चेंबूर येथील सुभाषनगर परिसरातील तळ अधिक सात मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावर काम सुरू असताना २८ फेब्रुवारीला परांची कोसळून सहा कामगार खाली पडले होते. या घटनेत रामूल्ला (५५) यांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले होते. जखमींपैकी आणखी दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून बुधवारी देण्यात आली आहे.

चेंबूर येथील दुर्घटनेत आणखी दोघांचा मृत्यू
Mumbai : चेंबूर बांधकाम दुर्घटना प्रकरणी कंत्राटदार, अभियंत्यासह चौघांवर गुन्हा दाखल

चेंबूरमधील सुभाषनगर भागात इमारतीचे बांधकाम काम सुरू असताना इमरातीच्या सातव्या मजल्यावरुन सहा कामगार खाली कोसळल्याची घटना शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेत सहा कामगार जखमी झाले होते, जखमींपैकी रामूल्ला याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर विजय (३५) व गंगाधर राई (२२) या दोघा कामगारांचा उपचारादरम्यान सायन रुग्णालयात मृत्यू झाला.

logo
marathi.freepressjournal.in