कोस्टल रोडवर होणार रेमंड कंपनीचे हेलिपॅड; मुंबई महापालिका आयुक्तांची मंजुरी, पालिकेला महिना मिळणार ४ लाखांचा महसूल

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड महत्वपूर्ण ठरला आहे. आता कोस्टल रोडवर लवकरच हेलिपॅड होणार आहे.
कोस्टल रोडवर होणार रेमंड कंपनीचे हेलिपॅड; मुंबई महापालिका आयुक्तांची मंजुरी, पालिकेला महिना मिळणार ४ लाखांचा महसूल
कोस्टल रोडवर होणार रेमंड कंपनीचे हेलिपॅड; मुंबई महापालिका आयुक्तांची मंजुरी, पालिकेला महिना मिळणार ४ लाखांचा महसूल
Published on

मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड महत्वपूर्ण ठरला आहे. आता कोस्टल रोडवर लवकरच हेलिपॅड होणार आहे. रेमंड कंपनीला हेलिपॅड उभारणीसाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली आहे. हेलिपॅड सेवेत आल्यापासून मुंबई महापालिकेच्या तिजोरीत महिना ४ लाख रुपयांचा महसूल जमा होणार असून हेलिकॉप्टरच्या फेऱ्यातून उत्पन्न कंपनीला मिळेल, त्यापैकी ५० टक्के उत्पन्न पालिकेला मिळणार आहे.

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंकपर्यंत कोस्टल रोडची निर्मिती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोडच्या कामाचा शुभारंभ झाला आणि मार्च २०२४ मध्ये कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला. कोस्टल रोडवरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे कोस्टल रोड मुंबईकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. आता याठिकाणी लहान आकाराचे हेलिकॉप्टरचे उड्डाण आणि उतरण्यासाठी हेलिपॅड बांधले जाणार आहे.

कोस्टल रोडवर होणार रेमंड कंपनीचे हेलिपॅड; मुंबई महापालिका आयुक्तांची मंजुरी, पालिकेला महिना मिळणार ४ लाखांचा महसूल
प्रवासी, कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठलेली 'बेस्ट' !

मार्च २०२४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या कामाचा आढावा घेऊन विविध निर्देशही दिले होते. यामध्ये सागरीकिनारा मार्गावर हेलिपॅड उभारण्याचा विचार करण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली होती. यानंतर महापालिकेने मल्टी मॉडेल ट्रान्स्पोर्टसाठी चाचपणी करताना सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सल्लागाराची नियुक्ती करून प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न सुरू केला. कोस्टल रोडजवळ मंत्रालय, विविध मंत्र्यांचे सरकारी बंगलेही आहेत. तसेच दक्षिण मुंबईत बडे उद्योगपतीही राहतात. त्यामुळे भविष्यात हेलिपॅड झाल्यास त्याचा फायदा या सर्वांना होणार असल्याने त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली.

वरळी येथील जेट्टी संरचनात्मकदृष्ट्या स्थिर

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत याविषयी बैठक घेऊन महापालिकेने चर्चा केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सागरी मंडळाने आयआयटीकडून जेट्टीच्या संरचनात्मक स्थिरतेचा अहवाल मागवला आणि अहवालानुसार वरळी येथील जेट्टी संरचनात्मकदृष्ट्या स्थिर असून जेट्टीचा वापर बहुआयामी वाहतुकीसाठी करू शकतो, असे अहवालात स्पष्ट केले. त्यानंतर हेलिपॅडची उभारणी करण्यासाठी त्याच्या अभ्यास करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. हेलिपॅडची उभारणी योग्य असल्याचे पालिकेने नियुक्त केलेल्या ‘पवन हंस लिमिटेड’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in