Mumbai : कोस्टल रोडवर हरित क्षेत्रासाठी सिंगापूर-बँकॉकची थीम; उद्यान, स्पोर्ट्स कोर्ट्स, आऊटडोअर जिम इत्यादी सुविधा, रिलायन्स साकारणार हरित क्षेत्र

मुंबईत हरित क्षेत्र निर्माण करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोस्टल रोडवर हरित क्षेत्र साकारण्यात येत आहे.
कोस्टल रोडवर हरित क्षेत्रासाठी सिंगापूर-बँकॉकची थीम
कोस्टल रोडवर हरित क्षेत्रासाठी सिंगापूर-बँकॉकची थीम'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : मुंबईत हरित क्षेत्र निर्माण करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोस्टल रोडवर हरित क्षेत्र साकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे हरित क्षेत्रासाठी सिंगापूर बँकॉकची थीम वापरली जाणार असून कोस्टल रोडला ‘ग्रीन नेकलेस’चा साज देण्यात येणार आहे.

रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने कोस्टल रोडवर हरित क्षेत्र साकारण्यात येणार आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी सिंगापूर, बँकॉक येथील उद्यानांची पाहणी केली, त्याठिकाणी कशा प्रकारचे साहित्य वापरले जाते, कुठली झाडे किती वर्षे टिकतात, याचा अभ्यास करण्यात आला.

कोस्टल रोड फक्त वाहतुकीसाठी न राहता पर्यावरणपूरक व्हावा यासाठी हरित क्षेत्र साकारण्यात येणार आहे. हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला असून यासाठी ४०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु हा खर्च सीएसआर फंडातून केल्यास पालिकेच्या निधीची बचत होणार असल्याने सीएसआर फंडातून हरित क्षेत्र निर्माण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हरित क्षेत्र साकारण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनने रस दाखवला आहे.

कोस्टल रोडवर हरित क्षेत्रासाठी सिंगापूर-बँकॉकची थीम
Mumbai : छुप्या शुल्कामुळे ग्राहक आणि रेस्टॉरंट व्यावसायिक त्रस्त; जेवणाच्या मूळ किमतीवर २५ ते ४० टक्के अधिक कमिशन

मरीन ड्राइव्ह ते वरळी सी-लिंक दरम्यान कोस्टल रोड मार्गाच्या दोन्ही बाजूला तसेच येणाऱ्या पर्यटकांसाठी योगा ट्रॅक, ओपन जिम, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान, लहान मुलांसाठी उद्यान, सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह आदी सुविधा असणार आहेत.

३० हजार रोपांची लागवड

५५ हेक्टरपैकी २१.५० हेक्टरवर तूर्तास ३० हजार रोपे लावण्यात येणार आहेत. सहा ते नऊ फूट उंचीचे १५ हजार रोपे, तर एक ते दीड फुटाची १५ हजार रोपे लावण्यात येतील. यामध्ये समुद्र फूल, बनियान ट्री यासह विविध प्रजातीची भारतीय रोपे पावसाळ्यात व त्यादरम्यान लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in