Mumbai : पाहुण्या वक्त्यावर लैंगिक छळाचा आरोप; सेंट झेवियर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

‘अंतास’ या वार्षिक महोत्सवात विद्यार्थिनींशी लैंगिक छेडछाड केल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या होत्या. याच कारणामुळे, त्या पाहुण्या वक्त्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai : पाहुण्या वक्त्यावर लैंगिक छळाचा आरोप; सेंट झेवियर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Published on

मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये हिंदी विभागाच्या कार्यक्रमात एका पाहुण्या वक्त्याने विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केले होते. ‘अंतास’ या वार्षिक महोत्सवात विद्यार्थिनींशी लैंगिक छेडछाड केल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या होत्या. याच कारणामुळे, त्या पाहुण्या वक्त्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२४ नोव्हेंबरला सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये हिंदी विभागाने राष्ट्रीय सेमिनार आयोजित केला होता. यामध्ये निमंत्रित केलेल्या पाहुण्या वक्त्याने विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केले होते. त्यावेळी १० पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी लैंगिक छळ आणि अयोग्य वर्तनाचे आरोप त्या वक्त्यावर केले होते.

विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, अखेर गुन्हा दाखल

कॉलेजच्या प्राचार्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. अन्वर अहमद सिद्दीकी (वय ६०) यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपीला ताब्यात घेण्यासाठी एक पथक वर्ध्याकडे रवाना करण्यात आले होते".

Mumbai : पाहुण्या वक्त्यावर लैंगिक छळाचा आरोप; सेंट झेवियर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार; विद्यार्थ्यांचा पाहुण्या वक्त्यावर लैंगिक छळाचा आरोप

कॉलेज प्रशासनाचा हस्तक्षेप

FIR नुसार, कॉलेजच्या हिंदी विभाग आयोजित ‘अंतास’ या वार्षिक महोत्सवातील राष्ट्रीय सेमिनारदरम्यान एकूण ९ विद्यार्थिनी आणि एका निवृत्त महिला शिक्षिकेने डॉ. सिद्दीकी यांच्यावर लैंगिक छेडछाड व अयोग्य वर्तनाचे आरोप केले होते. घडलेल्या प्रकारानंतर महोत्सवासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी “कारवाई न झाल्यास कार्यक्रमाचा बहिष्कार” टाकण्याचा इशारा दिला होता. यामुळे कॉलेज प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

डॉ. सिद्दीकी वर्ध्यातील हिंदी विद्यापीठाचे प्राध्यापक

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सिद्दीकी हे महात्मा गांधी हिंदी विद्यापीठ, वर्धा येथील प्राध्यापक आहेत. ते २३ नोव्हेंबर रोजी कॉलेजमध्ये आले आणि कॅम्पसमधील गेस्ट रूममध्ये थांबले होते. त्याच दिवशी त्यांनी गेस्ट मॅनेजमेंट टीममधील स्वयंसेवकांकडे पानमसाल्याची मागणी केली होती.

सेमिनारमध्येच गैरवर्तन, विद्यार्थिनींची प्रतिक्रिया

दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता सेमिनारदरम्यान डॉ. सिद्दीकी यांनी विद्यार्थिनींशी अयोग्य वर्तन केले. या घटनेचा विद्यार्थ्यांनी त्वरित निषेध व्यक्त केला त्यामुळे हे प्रकरण गंभीर बनले.

महोत्सवाच्या टीमकडून अधिकृत माफी

या घटनेनंतर २५ नोव्हेंबर रोजी ‘अंतास’च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विद्यार्थिनींशी पाहुण्या वक्त्याने गैरवर्तन केल्याची नोंद करत माफीनामा जाहीर करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी 'न्याय मिळावा आणि सर्व तक्रारींची सखोल चौकशी व्हावी', अशी मागणी केल्याने कॉलेज प्रशासनाने यावर दखल घेतल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in