मुंबई विमानतळाला कचरा व्यवस्थापनात प्लॅटिनम रेटिंग; ९९ टक्के कचऱ्यावर यशस्वी प्रक्रिया, CII कडून ‘झिरो वेस्ट टू लँडफिल’ने सन्मानित

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (सीएसएमआयए) कचरा व्यवस्थापनात मोठी कामगिरी केली असून कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीकडून (सीआयआय) मानाचे 'झिरो वेस्ट टू लँडफिल (झेडडब्ल्यूएल) प्लॅटिनम- क्लास १ रेटिंग प्राप्त केले आहे.
मुंबई विमानतळाला कचरा व्यवस्थापनात प्लॅटिनम रेटिंग; ९९ टक्के कचऱ्यावर यशस्वी प्रक्रिया, CII कडून ‘झिरो वेस्ट टू लँडफिल’ने सन्मानित
मुंबई विमानतळाला कचरा व्यवस्थापनात प्लॅटिनम रेटिंग; ९९ टक्के कचऱ्यावर यशस्वी प्रक्रिया, CII कडून ‘झिरो वेस्ट टू लँडफिल’ने सन्मानित (संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (सीएसएमआयए) कचरा व्यवस्थापनात मोठी कामगिरी केली असून कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीकडून (सीआयआय) मानाचे 'झिरो वेस्ट टू लँडफिल (झेडडब्ल्यूएल) प्लॅटिनम- क्लास १ रेटिंग प्राप्त केले आहे. विमानतळावर जमा होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी ९९ टक्क्यांहून अधिक कचऱ्यावर प्रक्रिया करून तो जमिनीखाली गाडण्याऐवजी (लँडफिल) पुनर्वापरासाठी वळवण्यात विमानतळ प्रशासनाला यश आले आहे. या मानांकनासह वार्षिक ५ कोटींहून अधिक प्रवासी हाताळणाऱ्या आणि हे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या मोजक्या भारतीय विमानतळांच्या रांगेत मुंबई विमानतळाचा समावेश झाला आहे.

‘मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’द्वारे (एमआयएएल) संचलित हे विमानतळ ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड’ (एएएचएल) आणि ‘भारतीय विमानतळ प्राधिकरण’ (एएआय) यांचा संयुक्त उपक्रम आहे. ‘सीआयआय’ने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये केलेल्या मूल्यांकनानुसार, विमानतळावर ओला आणि सुका कचरा, प्लास्टिक आणि इतर पुनर्वापरयोग्य वस्तूंचे वर्गीकरण व पुनर्प्राप्तीसाठी सर्वोत्तम यंत्रणा राबवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई विमानतळाला कचरा व्यवस्थापनात प्लॅटिनम रेटिंग; ९९ टक्के कचऱ्यावर यशस्वी प्रक्रिया, CII कडून ‘झिरो वेस्ट टू लँडफिल’ने सन्मानित
Mumbai : फाईव्ह स्टार हॉटेलवर पालिका मेहेरबान; विमानतळ परिसरातील पार्किंग कमी करणार, हाॅटेलवाल्यांना अधिकची जागा मिळणार  

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रामुख्याने अन्न, प्लास्टिक, कागद आणि ऑपरेशनल कचरा जमा होतो. हा कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे आणि पुनर्प्राप्ती करणे या ‘५आर’ तत्त्वावर आधारित कार्यपद्धतीमुळे लँडफिलवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.

शाश्वत विकासाच्या दिशेने पाऊल

पर्यावरण आणि शाश्वतता कक्षाच्या माध्यमातून विमानतळावर कचरा संकलन आणि हस्तांतरणासाठी विशेष पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या यशाव्यतिरिक्त विमानतळाने गेल्या वर्षभरात १०० टक्के अक्षय ऊर्जेचा वापर, ऊर्जा कार्यक्षमतेत ४० टक्क्यांहून अधिक सुधारणा आणि जमिनीवरील ताफ्याचे विद्युतीकरण यांसारखे महत्त्वाचे उपक्रम राबवले आहेत. शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेल्या या पावलांमुळे जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात मुंबई विमानतळाचे स्थान अधिक बळकट झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in