Mumbai : जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा; तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित

दक्षिण मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात मूळ भाडेकरू, रहिवासी यांना विकासकाकडून मिळणारे संक्रमण भाडे, सदनिकांचा ताबा व इतर वादांसंबंधीच्या तक्रारींचे निवारण आता लवकर होणार आहे.
Mumbai : जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा; तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित
Mumbai : जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा; तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित
Published on

मुंबई : दक्षिण मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात मूळ भाडेकरू, रहिवासी यांना विकासकाकडून मिळणारे संक्रमण भाडे, सदनिकांचा ताबा व इतर वादांसंबंधीच्या तक्रारींचे निवारण आता लवकर होणार आहे.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने विकसित केलेल्या तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या फ दक्षिण विभागाच्या दादर पूर्व येथील विभागीय कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व म्हणाले की, तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली, या डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून भाडेकरू आणि रहिवाशांच्या समस्या वेळेत, पारदर्शकपणे आणि संवेदनशीलतेने सोडवण्यासाठी म्हाडाने उचललेले एक लोककेंद्रित पाऊल आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात मूळ भाडेकरू/ रहिवासी यांना विकासकाकडून मिळणारे संक्रमण भाडे व इतर तक्रारींचे निवारण अधिक जलदगतीने करून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देणे शक्य होईल.

Mumbai : जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा; तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित
गोरेगावमधील मोतीलालनगर पुनर्विकासाचा मास्टर प्लान लवकरच; उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार

हा उपक्रम म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींतील भाडेकरू, रहिवासी यांना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत सेवा देण्याच्या म्हाडाच्या बांधिलकीचा भाग आहे तसेच ते पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाची समस्या ऐकली जावी आणि तिचे वेळेत निवारण व्हावे, हीच या उपक्रमामागची खरी भावना असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

भाडेकरूंना पुनर्वसनाचा लाभ मिळणार

म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये भाडेकरू, रहिवासी यांना वेळेवर भाडे न मिळणे, विकासकांकडून (डेव्हलपर) होणारी दिरंगाई आणि इतर समस्यांच्या जलद निराकरणासाठी ही वेळबद्ध यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. पुनर्विकास प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत आणि भाडेकरूंना पुनर्वसनाचा लाभ मिळावा, यासाठी या प्रणालीची मदत होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in