Mumbai : आस्थापनांवर मराठी पाट्या झळकल्या; विधी समिती अध्यक्षांचा दणका

मराठी पाट्या लावणे बंधनकारक असताना वारंवार सांगूनही दुर्लक्ष करणे मुंबईतील अस्थापनाच्या अंगलट आले.
Mumbai : आस्थापनांवर मराठी पाट्या झळकल्या; विधी समिती अध्यक्षांचा दणका
Mumbai : आस्थापनांवर मराठी पाट्या झळकल्या; विधी समिती अध्यक्षांचा दणका
Published on

मुंबई : मराठी पाट्या लावणे बंधनकारक असताना वारंवार सांगूनही दुर्लक्ष करणे मुंबईतील अस्थापनाच्या अंगलट आले. विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी ग्राऊंड झिरोवर धाडसत्र सुरु करत ज्या आस्थापनांवर मराठी पाट्या नाही त्यांना ऑन दी स्पाॅट नोटीस बजावण्यास सुरुवात केली. कारवाईचा बडगा उगारताच मुंबईतील आस्थापनांवर ठळकपणे दिसतील अशा देवनागरी लिपीत मराठी पाट्या झळकण्यास सुरुवात झाली आहे.‌

पी-पूर्व विभागातील दुकानदाराने तातडीने मराठी पाटी लावली. दरम्यान, मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनावर दंडात्मक कारवाई पुढेही सुरूच राहणार, असा इशारा विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी दिला आहे.

Mumbai : आस्थापनांवर मराठी पाट्या झळकल्या; विधी समिती अध्यक्षांचा दणका
मराठी पाट्या लावण्याचा नियम सर्रास धाब्यावर; ३ हजारांहून अधिक आस्थापनांना न्यायालयाचा दणका; १ कोटी ९१ लाखांचा दंड वसूल

मुंबईत ९ लाखांहून अधिक आस्थापना असून दुकानाच्या बाहेर ठळकपणे दिसतील अशा देवनागरी लिपीत मराठी पाट्या लावणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंधनकारक आहे. मराठी पाटी अस्थापनावर नसल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. २८ नोव्हेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत १,५८,११६ भेटी दिल्या. त्यापैकी १,५३,०९६ आस्थापनांमध्ये अधिनियमातील तरतुदींनुसार नामफलक प्रदर्शित केल्याचे आढळले तर ५,०२० आस्थापनांना अधिनियमातील तरतुदींनुसार नामफलक प्रदर्शित न केल्याबाबत निरीक्षण अहवाल देण्यात आले. त्यानंतर आस्थापनांवर ठळकपणे दिसतील अशा देवनागरी लिपीत मराठी पाट्या लागल्याच पाहिजे, यासाठी उपमहापौर संजय घाडी आणि विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in