Mumbai : सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करा! ­समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन

यंदाचा गणेशोत्सव भक्ती, सुरक्षितता, शिस्त, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करावा, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
Mumbai : सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करा! ­समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन
Published on

मुंबई : यंदाचा गणेशोत्सव भक्ती, सुरक्षितता, शिस्त, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करावा, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे. यंदाचा गणेशोत्सवास सोमवारपासून सुरू झाला आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे गणरायाचे स्वागत करताना भक्तीबरोबरच सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी जपण्याचे आवाहन समितीने केले आहे. गणेश मंडळांनी मंडप, विद्युत व्यवस्था, गणेशमूर्तीचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान आवश्यक सुरक्षा उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. स्वयंसेवकांच्या माध्यमातून गर्दीचे योग्य नियोजन करून आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवावेत, याकडे समितीने लक्ष वेधले आहे.

Mumbai : सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करा! ­समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन
Mumbai : गणेशोत्सवासाठी BMC सज्ज; महापौर, उपमहापौरांकडून विसर्जनस्थळांची पाहणी

व्यसनमुक्ती, महिला व बालसुरक्षा, रक्तदान, अवयवदान, शिक्षण, आरोग्य, डिजिटल व सायबर सुरक्षा तसेच गरजूंच्या मदतीसारखे सामाजिक उपक्रम राबवावेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले आणि दिव्यांग भाविकांसाठी शक्य तितक्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे समितीने म्हटले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा!

ध्वनिक्षेपकाबाबत शासन, न्यायालय आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. ध्वनी हा उत्सवाचा भाग असला तरी संयम हीच संस्कृती असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. मंडळांनी निर्माल्याचे योग्य संकलन व विलगीकरण करावे. विसर्जन व्यवस्थेबाबत प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन समितीने केले आहे.

भक्ती असेल तर शिस्त असेल, परंपरा असेल तर सुरक्षितता असेल. उत्साह असेल तर सामाजिक भान असेल आणि गणरायाची सेवा असेल तर समाजसेवाही असेल. गणेश मंडळे ही प्रशासनाची केवळ परवानगी घेणारी संस्था नसून, सुरक्षित आणि शिस्तबद्ध गणेशोत्सवाच्या आयोजनातील महत्त्वाची भागीदार आहेत. सर्वांनी मिळून भक्तीचा आनंद, संस्कृतीचा अभिमान आणि सामाजिक जबाबदारीचा आदर्श निर्माण करणारा गणेशोत्सव साजरा करावा.

ॲड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

logo
marathi.freepressjournal.in