Mumbai : निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ; मिरवणुकीला जल्लोषात प्रारंभ

दहा दिवसांच्या भक्ती, आनंद आणि जल्लोषानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभरातील गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. मुंबई गणरायाला निरोप देण्यासाठी सज्ज झाली आहे.
Mumbai : निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ; मिरवणुकीला जल्लोषात प्रारंभ
Published on

दहा दिवसांच्या भक्ती, आनंद आणि जल्लोषानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभरातील गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. मुंबई गणरायाला निरोप देण्यासाठी सज्ज झाली आहे. वरूणराजाचे देखील आगमन झालेले आहे. मुंबईतील गणेश गल्लीचा गणपत म्हणजे मुंबईचा राजा सकाळी आरतीनंतर विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

गणेश गल्लीसह तेजुकाया सार्वजनिक मंडळ आणि परळचा राजा यांचीही विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात भक्तीचा जल्लोष दिसून येत असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमले आहे.

मुंबईकरांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी १० नंतर सुरू होणार आहे. लाखो भाविक या सोहळ्यासाठी रस्त्यावर दाखल झाले असून, गणेशभक्ती आणि भावनांचा आजचा दिवस अविस्मरणीय ठरणार आहे.

मुंबई पोलिसांची अभूतपूर्व तयारी

यंदा प्रथमच मुंबई पोलिसांकडून विसर्जनासाठी एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. गर्दी व वाहतूक नियंत्रणासाठी १० हजार सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरे तैनात आहेत. तब्बल २५ हजार पोलीस कर्मचारी आणि १० हजार महानगरपालिका कर्मचारी विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरक्षेसाठी काम पाहत आहेत. यावर्षी सुमारे ६५०० सार्वजनिक गणेश मंडळांच्या आणि दीड लाख घरगुती मूर्तींच्या मिरवणुका निघणार असल्याने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in