गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालबाग-परळ परिसरात होणाऱ्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांनी विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी
गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालबाग-परळ परिसरात होणाऱ्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांनी विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन सोहळ्यांदरम्यान होणारी अतिगर्दी, धक्काबुक्की आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी लालबाग उड्डाणपूल तसेच परळ वर्कशॉप परिसरातील रस्त्यांच्या दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्स उभारून त्यावर हिरवे पडदे (ग्रीन कव्हर) लावण्यात आले आहेत.

१४ सप्टेंबरला लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झाली असून गणेश भक्तांमध्ये लगबग सुरू आहे. गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारीला वेग दिला असून अनेक मोठ्या गणेशमूर्तीचे आगमनही सुरू

झाले आहे. दर शनिवार-रविवारी लालबाग, परळ, चिंचपोकळी, भारतमाता आणि आयटीसी परिसरातील कार्यशाळांमधून गणेशमूर्ती मंडपांकडे नेल्या जात आहेत. या वेळी मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने परिसरात प्रचंड गर्दी होत आहे.

नियोजन आणि शिस्त

रस्त्याच्या याशिवाय परळ वर्कशॉप ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या दरम्यानच्या दुभाजकांवरही बॅरिकेड्स आणि ग्रीन कव्हर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना दुभाजकांवर उभे राहणे किंवा गर्दीच्या वेळी धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडणे शक्य होणार नाही.

पोलीस व वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार या उपाययोजना केल्या आहेत. गर्दीमुळे अपघात होऊ नये, हा यामागील उद्देश आहे. पुलाच्या एका बाजूला पडदे लावण्यात आले असून दुसऱ्या बाजूलाही अशीच व्यवस्था करण्याचा विचार असल्याचे एफ-दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त वृषाली इंगुळे यांनी सांगितले.

अपघाताचा धोका टळणार

गणेशमूर्तीच्या आगमनावेळी तसेच विसर्जनाच्या दिवशी अनेक नागरिक लालबाग उड्डाणपुलावर उभे राहून सोहळा पाहतात. काही जण पुलाच्या कठड्यांवरून वाकून पाहण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन पुलावरील एका बाजूला लोखंडी बॅरिकेड्स उभारून त्यावर उंच हिरवे पडदे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे पुलावरून थांबून सोहळा पाहण्यास आळा बसणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in