Mumbai : रेल्वे स्टेशनवर करत होता अश्लील हावभाव; तरुणीने घडवली चांगलीच अद्दल, Video व्हायरल

गोवंडी रेल्वे स्टेशनवर एका तरुणीने तिच्याशी अश्लील हावभाव करणाऱ्या तरुणाला चांगला धडा शिकवल्याची घटना समोर आली आहे. रेल्वेची वाट पाहत असलेल्या तरुणीसमोर हा संतापजनक प्रकार घडला.
Mumbai : रेल्वे स्टेशनवर करत होता अश्लील हावभाव; तरुणीने घडवली चांगलीच अद्दल, Video व्हायरल
Published on

गोवंडी रेल्वे स्टेशनवर एका तरुणीने तिच्याशी अश्लील हावभाव करणाऱ्या तरुणाला चांगला धडा शिकवल्याची घटना समोर आली आहे. रेल्वेची वाट पाहत असलेल्या तरुणीसमोर हा संतापजनक प्रकार घडला. मात्र, घाबरण्याऐवजी तरुणीने धाडस दाखवत त्याचा व्हिडिओ काढला आणि थेट त्याच्यासमोर जाऊन त्याला चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ mumbai_tv या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की गोवंडी स्टेशनवर एक तरुण मुद्दाम तरुणीकडे पाहत अश्लील हावभाव करत आहे. तरुणी त्याचे घाणेरडे हावभाव मोबाईलमध्ये कैद करते. त्यानंतर ती प्लॅटफॉर्म बदलत थेट त्या तरुणाजवळ जाते आणि त्याला त्याच्या वर्तनाबद्दल जाब विचारते.

“तुला व्हिडिओ दाखवू का? माझ्याकडे पाहून कोणते हावभाव करत होतास?” असा सवाल करत ती त्याला चांगलाच सुनावते आणि सपासप कानाखाली मारते. इतकेच नव्हे, तरुणीची अवस्था पाहून तेथे उपस्थित इतर तरुणही पुढे येतात आणि संबंधित तरुणाला चोप देतात.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तरुणीच्या धाडसाचे आणि सजगतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिलांना छेडछाड करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात तिने दाखवलेल्या या निर्भीड भूमिकेचे नेटिझन्सनी स्वागत केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in