मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. शुक्रवारी (दि. १९) सकाळी न्यायालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर ही धमकी आली.
मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी
Published on

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. शुक्रवारी (दि. १९) सकाळी न्यायालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर ही धमकी आली. यानंतर तत्काळ पोलिसांनी न्यायालय परिसरात सुरक्षा वाढवली, तसेच सखोल सर्च ऑपरेशन सुरू केले. बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण आवाराची तपासणी करण्यात आली. मात्र, पोलिसांना काहीही संशयास्पद सापडले नाही.

या घटनेनंतरही न्यायालयाचे कामकाज नियमित वेळेनुसार सुरू आहे. याआधीही १२ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाला अशीच धमकी मिळाली होती. त्यावेळी सुरक्षा कारणास्तव कोर्टातील सुनावणी काही तासांसाठी स्थगित करण्यात आली होती. तसेच, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

अल्पावधीतच दुसऱ्यांदा मिळालेल्या या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे. न्यायालय परिसरात पोलिसांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली असून, सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in